घरमहाराष्ट्रVikhe Vs Thorat : थोरातांनी विखेंचा केला 'धंदेवाईक राजकारणी' उल्लेख; विखे म्हणाले-...

Vikhe Vs Thorat : थोरातांनी विखेंचा केला ‘धंदेवाईक राजकारणी’ उल्लेख; विखे म्हणाले- ते रात्रीला…

Subscribe

शिवजयंतीनिमित्त महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील राहता शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अहमदनगर : राज्यातील राजकारणात विखे विरुद्ध थोरात असा सामना नेहमीच रंगतो. दोघांकडूनही एकमेकांवर टीकेचा बाण सोडले जातात. असे असतानाच आता पुन्हा एकदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात असा सामना रंगण्याची चिन्हं आहेत. कारण, विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांचं नाव घेता त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. (Vikhe vsThorat Thorat referred to Vikhe as a professional politician Vikhe said that night)

शिवजयंतीनिमित्त महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील राहता शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारीदेखील मिळाली आहे. या पक्षप्रवेशाबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, भाजपमध्ये कुणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. काही लोकांनी थेट भाजपमध्ये येण्याची भूमिका घेतली. मात्र नगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात, असं म्हणत विखे पाटील यांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला. त्यांच्या या टीकेला थोरातांकडून कसे उत्तर मिळते हे पहावे लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Jain Vishwabharati University : शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश असावा- राज्यपाल बैस

काँग्रेसच्या शिबिरातून साधला होता विखेंवर निशाणा

लोणावळ्यात नुकतेच काँग्रेसचे अधिवेशन पार पडले. या शिबिरात बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करताना धंदेवाईक राजकारणी म्हणून उल्लेख केला होता. सत्ता असेपर्यंत ते संबंधित पक्षात असतात. सत्ता जाण्याची जशीही चाहूल लागते, तसे ते उडी मारतात, असे टोमणे थोरातांनी विखेंना मारले होते. त्यांच्या याच फटकेबाजीला विखेंनी उत्तर दिलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात, असा टोला विखे पाटलांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात यांना लगावला.

- Advertisement -

हेही वाचा : Politics : विधानसभेपूर्वी ठाकरे शिंदेंचं नेतृत्व स्वीकारून मोदींना पाठिंबा देतील; अपक्ष आमदाराचा दावा

सुप्रिया सुळेंच्या टीकेलाही उत्तर

खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याच्या निर्यातीशुल्काच्या मुद्द्यावरुन टीका केली होती. त्याला उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, कांदा निर्यातबंदी उठवण्यासंदर्भात भारत सरकारने आमची मागणी मान्य केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील निर्यात बंदी उठविण्यासाठी प्रयत्नशील होते. यापुढे दलालांमार्फत खरेदी पेक्षा शेतकऱ्यांना थेट कांदा निर्यात करण्याला परवानगी देण्याचा सरकारचा विचार सुरू असून आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचं विखे पाटलांनी म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -