विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा, डॉक्टरांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

तसंच, पुढील ४८ तासांत व्हेंटिलेटर काढला जाऊ शकतो, असंही रुग्णालयाकडून सांगण्यात आलं.

virkam gokhale

पुणे – मराठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक माहिती आज दीनानाथ मंगेशकर रुग्णलायाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली. तसंच, पुढील ४८ तासांत व्हेंटिलेटर काढला जाऊ शकतो, असंही सांगण्यात आलं. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माध्यमांसमोर मेडिकल बुलेटिन सादर केले.

हेही वाचा विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत येणाऱ्या अफवा निराधार, रुग्णालयाकडून अधिकृत स्पष्टीकरण

विक्रम गोखले ५ नोव्हेंबरपासून पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दाखल आहेत. गेल्या ४८ तासांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. बुधवारी रात्रीपासून त्यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे सिनेसृष्टीतून चिंता व्यक्त केली जात होती. दरम्यान, ते अजूनही व्हेंटिलेटरवरच असून त्यांचा बीपी आणि हार्ट स्टेबल असल्याची माहिती देण्यात आली आहे. विक्रम गोखले यांच्या तब्ब्येतीत सुधारणा आहे. पुढील 48 तासांत व्हेंटीलेटर काढला जाऊ शकतो. ते डोळे उघडतायत, अशी माहिती देण्यात आली आहे.

विक्रम गोखले यांची प्रकृती काल  बिघडली होती. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. अनेकांनी त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली. विक्रम गोखले यांच्या कुटुंबिय आणि रुग्णालयाकडून कोणीतीही अधिकृत माहिती समोर येत नसल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्यातच, बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, नवाजउद्दीन सिद्दीकी यांसारख्या अभिनेत्यांनीही त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देत श्रद्धांजलीपर ट्विट केले. त्यामुळे अफवा वाऱ्यासारखी पसरली.

हेही वाचा – विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटिन जारी, समोर आली महत्त्वाची माहिती

अखेर, विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी फेटाळून लावली. तसंच, गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेत विक्रम गोखले यांचे निकटवर्तीय राजेश दामले आणि दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी त्यांच्या तब्येतीबाबत माहिती देत मेडिकल बुलेटीन जारी केले. त्यानंतर गोंधळ मावळला. मात्र, तरीही अनेकजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत अफवा पसरवत होते. यावरून सोशल मीडियावरही बराच गोंधळ निर्माण झाला होता.