Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र लाचखोर अधिकार्‍यांना गावबंदी; नाशिकच्या 'या' ग्रामपंचायतीचा अनोखा ठराव

लाचखोर अधिकार्‍यांना गावबंदी; नाशिकच्या ‘या’ ग्रामपंचायतीचा अनोखा ठराव

Subscribe

नाशिक : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे (Khedale-zungale) गावात एक आदर्शवत ठराव ग्रामपंचायतीतील ग्रामसभेत घेण्यात आला. हा ठराव संपूर्ण पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे. ठराव असा की, जो कोणी सरकारी अधिकारी-कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात रंगेहाथ पकडला जाईल, त्याला गावबंदी आणि कामबंदी करण्यात येईल. नाशिक जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहे.

परंतु, एसीबीच्या ट्रॅपमध्ये पकडला गेलेला अधिकारी, कर्मचारी काही दिवसांनी कामावर पुन्हा रुजू होतो. सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना पाठीशी घालणार्‍या कुचकामी कायद्यांमुळे भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यामुळेच लाच खातांना अधिकार्‍यांना कसलीही भीती वाटत नाही. रंगेहाथ पकडलो गेलो तरी पुन्हा कामावर घेणारच आहे. हा पराकोटीचा विकृत आत्मविश्वास सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्यात निर्माण झालेला आहे. त्याचमुळे लाच खाण्याचे सत्र थांबतांना दिसत नाही.

- Advertisement -

यातच ग्रामस्थांनी अनोखी शक्कल वापरून शा भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी यांना गावात येण्यास बंदी व असा कोणी भ्रष्ट तलाठी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक,शिक्षक असेल तर त्याला कामबंदीचा ठराव घेण्यात आला. असा ठराव संपूर्ण महाराष्ट्रातील गावांनी घेतला तर या भ्रष्टाचार्‍यांना नक्कीच चाप बसेल आणि गावबंदी आणि कामबंदी झाल्यामुळे सरकारला देखील यांना पुन्हा कामावर घेणे अवघड होऊन बसेल. म्हणून या आदर्शवत ठरावाची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा रंगताना दिसून येत आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -