Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र नाशिकच्या 'या' गावात पुढार्‍यांना गावबंदी; मंत्री, आमदार, खासदारांना वेशीवरच विचारणार जाब

नाशिकच्या ‘या’ गावात पुढार्‍यांना गावबंदी; मंत्री, आमदार, खासदारांना वेशीवरच विचारणार जाब

Subscribe

नाशिक : अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील कांदा आधीच खराब झाला होता, तरीही शेतकर्‍यांनी मोठ्या हिमतीने तो चाळीत साठवला. परंतु त्याला अवकाळीचा फटका बसला त्यामुळे तो खराब होत आहे. कांदा अनुदानाची फक्त घोषणाच झाली अद्याप शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाली नाही. सर्वच राजकीय पक्ष शेतकर्‍यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही, त्यामुळे अशा पुढार्‍यांना वेशिवरच रोखून जाब विचारण्याची वेळ आली आहे.

रविवार (दि. २१) पासून कुठल्याही राजकीय लोकप्रतिनिधींनी जसे मंत्री, आमदार, खासदार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी मुंजवाड गावात प्रवेश करू नये, केल्यास त्यांच्यावर कांदा फेकून निषेध केला जाईल असा ठराव शेतकरी क्रांती मोर्चा मुंजवाड व कांदा उत्पादक शेतकरी यांच्यावतीने करण्यात आला. आज गावाच्या चारही बाजूने राजकीय पुढार्‍यांना गावात प्रवेश बंदचे फलक लावण्यात आले. सध्याच्या परिस्थितीला शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. तसेच इतर शेतीमालालाही भाव नाही.

- Advertisement -

टोमॅटो, मिरची, कोबी फेकण्याची वेळ आली आहे. देशाची अर्थव्यवस्था शेतकर्‍यांच्या हातात असून शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली आहे. याच पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व गावकर्‍यांनी राजकीय पुढार्‍यांना गांवबंदी केल्या शिवाय पर्याय नाही. राजकीय पुढार्‍यांनी शासनाला जाब विचारला पाहिजे. असे मत शेतकरी क्रांती मोर्चा मुंजवाडचे प्रतिनिधी केशव सूर्यवंशी यांनी केले. यावेळी मुंजवाड गावातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी व शेतकरी क्रांती मोर्चाचे वैभव आहिरे, नानाजी जाधव, महेंद्र जाधव, उमेश खैरनार, विनोद जाधव, भगवान जाधव, भास्कर बागूल, योगेश जाधव, काशिनाथ जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारने नाफेडमार्फत 3 लाख टन कांदा खरेदीची घोषणा केली खरी, परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. कांदा अनुदान जाहीर होऊन दीड-दोन महिने झाले तरी अद्यापपर्यंत दमडीही मिळाली नाही. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या पुढार्‍यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे. : कुबेर जाधव, संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -