घरमहाराष्ट्रमहाबळेश्वरला साकारणार मधाचे गाव, सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार उद्घाटन

महाबळेश्वरला साकारणार मधाचे गाव, सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Subscribe

राज्याच्या अनेक भागात शेतीला पूरक म्हणून मधमक्षिका पालनाचा व्यवसाय केला जातो. सध्याच्या घडीला राज्यातील ४९० गावांमध्ये मधमाशा पालन होते. यामध्ये ४० हजार मधपालक मध संकलनाचे काम करतात.  

पर्यटकांना चांगल्या प्रतीचे शुध्द मध मिळण्याबरोबरच रोजगाराला चालना मिळण्यासाठी महाबळेश्वरमधील मांघर गावात मधाचे गाव ही अनोखी संकल्पना राबवण्यात येणार आहे. सामूहिक मधुमक्षिका पालनाच्या माध्यमातून मधाचे गाव अशी संकल्पना राबवणारे मांघर हे देशातील पहिलेच गाव आहे. या योजनेचे उद्घाटन येत्या १६ मे रोजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होईल.

राज्याच्या अनेक भागात शेतीला पूरक म्हणून मधमक्षिका पालनाचा व्यवसाय केला जातो. सध्याच्या घडीला राज्यातील ४९० गावांमध्ये मधमाशा पालन होते. यामध्ये ४० हजार मधपालक मध संकलनाचे काम करतात.  महाबळेश्वरपासून आठ किमी अंतरावर असलेल्या डोंगर कड्यावरील मांघर गावातील १०० पैकी ८० कुटुंबे मधमाशा पालन करतात.  या गावाच्या भोवती घनदाट जंगल असून या ठिकाणी वर्षभर फुलोरा असतो.  या भागात मधमाशांमुळे परागीकरण होऊन पिकांची उत्पादकता वाढल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मधाचे गाव ही संकल्पना या गावातून सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर इतर जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येईल.

- Advertisement -

उद्योग विभागाच्या अखत्यारीतील राज्य खादी आणि  ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने मांघरमध्ये मधाचे गाव ही संकल्पना राबवण्यात येणार आहे त्यासाठी गावात मधपेट्या वितरित करण्यात येतील. शेतामध्ये मधपेट्या ठेवून त्यामाध्यमातून मध गोळा केले जाईल. यातून अत्यंत शुध्द आणि  चांगल्या दर्जाचे मध मिळेल आणि ग्रामीण भागातील रोजगाराला चालना मिळेल. या योजनेचे उदघाटन  १६ मे रोजी सकाळी ११  वाजता होणार असून  यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -