घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपिण्याचे पाणी शुद्धीकरणाची जबाबदारी ग्रामपंचायतींवर

पिण्याचे पाणी शुद्धीकरणाची जबाबदारी ग्रामपंचायतींवर

Subscribe

नाशिक : गावातील पिण्याच्या पाण्याचे शुध्दीकरण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. पाण्याचे दररोज शुध्दीकरण करणे आवश्यक आहे. पाणी गुणवत्ता व सनियंत्रणाच्या कामात कोणताही हलगर्जीपणा न करता नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले.

नांदगाव व चांदवड तालुक्यात सरपंच व ग्रामसेवकांची आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. एकाही गावात अशुध्द पाण्यामुळे कुणालाही त्रास झाल्यास याबाबत ग्रामसेवक व सरपंच यांना जबाबदार धरणेत येणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे गावातील पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनची (स्त्रोत ते शेवटच्या नळ जोडणीपर्यंत) तपासणी करून गळती असल्यास दुरुस्ती करून सुस्थितीत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. पुरग्रस्त गावांमधील वापरात असलेले पिण्याच्या पाण्याचे स्रोत हे पुराच्या पाण्यामुळे बाधित होतात, अशा वेळेस गावातील इतर स्रोतांचा वापर करण्यासाठी पूर्व नियोजन म्हणून त्याची स्वच्छता व तपासणी करून पाणी पुरवठा करणेस उपयोगात आणण्याचे निर्देश त्यांनी दिले.

- Advertisement -

टी.सी.एल. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. गटविकास अधिकार्‍यांनी तालुकास्तरावर सरपंच व ग्रामसेवक यांची व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठक घेऊन त्यामध्ये गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे शुध्दीकरण करणे, गावातील सर्व कचर्‍याचे व्यवस्थापन करणे, गावातील सर्व परिसराची स्वच्छता करणे आदी कामे करणेबाबत माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. आढावा बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (ग्रामपंचायत) रविंद्र परदेशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (पाणी व स्वचछता) डॉ. वर्षा फडोळ, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) पुरुषोत्तम भांडेकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा जीवन बेडवाल यांसह गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी) आरोग्य, ग्रामपंचायत) आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -