घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसप्तशृंग देवस्थान व्यवस्थापनाच्या विरोधात गावकर्‍यांचा 'बंद'

सप्तशृंग देवस्थान व्यवस्थापनाच्या विरोधात गावकर्‍यांचा ‘बंद’

Subscribe

सप्तशृंगगड : श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने नव्याने सुरक्षा रक्षक रुजू केल्याबाबत व त्यांची हकालपट्टी करणे तसेच इतर मागण्यांसाठी ग्रामस्थांनी पहिली पायरी ते रोपवे ट्रॉली आणि रोपवे ते ट्रस्ट कार्यालय येथे रॅली काढत निषेध व्यक्त करण्यात आला. गावातील सर्व दुकाने बंद ठेवत निषेध व्यक्त करत गाव बंदची हाक देण्यात आली.

विश्वस्त संस्थेच्या कारभाराविरोधात गावकर्‍यांनी बंद पुकारला आहे. यामध्ये सरपंच, सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ग्रामस्थ, व्यापारी, लोकप्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. ग्रामस्थांच्या वतीने विविध मुद्दे मांडण्यात आले. यावेळी तहसीलदार बंडू कापसे, पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी ग्रामस्थांच्या मागण्या दहा दिवसांत बैठक घेऊन पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र ग्रामस्थांनी बेमुदत बंदचा निर्णय घेण्याचा विचार करताच अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी सप्तशृंगी ग्रामपंचायत सदस्य व व्यापारी यांचाशी संपर्क साधला. मात्र समाधानकारक व लेखी उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थांनी सप्तशृंग गडावरचे दुकाने बंद करून निर्धारित काळासाठी निषेध व्यक्त करण्याचे ठरवले. दरम्यान, भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. मात्र ग्रामस्थांनी बेमुदत बंद पुकारल्याने गाव बंद असणार आहे.

- Advertisement -

नव्याने रुजू केलेल्या सुरक्षारक्षकांवर वर्षाचा १.२५ कोटींचा खर्च भाविकांच्या देणगीतून विश्वस्त संस्था उधळपट्टी करत आहे. मात्र स्थानिक व संस्थेतील अनेक वर्ष कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी वर्गास मात्र गेल्या पाच ते दहा वर्षांपासून आठ ते दहा हजारच पगार आहे व जे नवीन स्थानिक कर्मचारी लावता त्यांना मात्र दोनशे ते अडीचशे रुपये रोज देतात तर नवीन सुरक्षारक्षकांना 25 ते 30 हजार रुपये पगार कसा? व त्यांना ट्रस्टी सुरक्षारक्षक म्हणून भरती करू शकता तर स्थानिकांना संस्थेत भरती का करत नाहीत? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. तो खर्च भाविकांच्या सुखसुविधेसाठी वापरावा. उर्वरित निधी तीन मजली दवाखाने, एम. डी. मेडिसीन डॉक्टरची नेमणूक करावी, शौचालय, स्नानगृह, पहिली पायरी ते मंदिर परिसर प्रथमोपचार किट्स ठेवावे, स्थानिक जुन्या कर्मचार्‍यांचे मानधन वाढवून सुरक्षारक्षक म्हणून समाविष्ट करावे आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

मौजे सप्तशृंग गड येथे ट्रस्ट प्रशासनाबाबत विविध मागणी संदर्भात गाव बंद आंदोलन ठेवण्यात आले होते. परंतु ट्रस्ट प्रशासनाच्या वतीने कोणताही समाधानकारक प्रतिसाद प्राप्त झालेला नाही, आंदोलनातील मागणी संदर्भात लेखी आश्वासन प्राप्त झाले नाही. त्यामुळे समस्त ग्रामस्थांनी सदर गाव बंद आंदोलन सोमवार (दि. ५) पासून समाधानकारक लेखी खुलासा प्राप्त होईपावेतो बेमुदत कालावधीसाठी सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सदर कालावाधीत कोणतीही शांतता व कायदासुव्यस्था विस्कळीत होणार नाही यांची दक्षता घेतली जाईल. : रमेश पवार-सरपंच

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या रोपवे ट्रॉलीमधील अधिकार्‍यांच्या मनमानी विरोधात ब्रेक दिलेल्या आदिवासी तरुणांना पुन्हा कामात समाविष्ट करावे. : अजय दुबे, उपजिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

काही निमशासकीय सुरक्षारक्षक संस्थांच्या वतीने ठेवण्यात आले आहे. मात्र गावातील तरुण युवक बेरोजगार असल्यामुळे विश्वस्त संस्थेने गावातील नागरिकांना रोजगार मिळवून द्यावा व नव्याने रुजू केलेल्या सुरक्षारक्षकांची हकालपट्टी करावी. : दत्तू बर्डे, ग्रामपंचायत सदस्य

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने ४० सुरक्षारक्षक हे नेमणूक केलेली आहे तर स्थानिक सुशिक्षीत बेरोजगारांना ट्रस्ट भरती का करत नाही व केले तरीसुद्धा यात्रा कालावधी किंवा गर्दीच्या कालावधीतच भरती केले जाते व त्यानंतर त्यांना काढून टाकण्यात येते. त्यांना दोनशे ते अडीचशे रुपये रोज दिला जातो तर नवीन रुजू केलेल्या चाळीस सुरक्षारक्षकांना 25 ते 30 हजार रुपये पगार कस काय दिला जातो व त्यांची भरती कशी केली जाते. आमच्यासारख्या सुशिक्षीत बेरोजगारांना वीस ते पंचवीस हजार रुपये महिना दिला तर गावातील आम्ही सुशिक्षीत बेरोजगार उद्यापासून ट्रस्टमध्ये कामाला जाऊ. : समीर बेणके, ग्रामस्थ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -