घरमहाराष्ट्रग्रामस्थ मंडळाची खोली आली धोक्यात

ग्रामस्थ मंडळाची खोली आली धोक्यात

Subscribe

लोअर परळच्या डिलाईल रोडवर अनेक गावांच्या मंडळांच्या खोल्या आहेत. गावची मालकी असलेल्या या खोल्यांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून राहत असलेले हे तरुण आता बेघर होण्याच्या मार्गावर आहेत. लालसेपोटी ही खोली विकण्याचा काहीजण विचार करत आहेत.

लोअर परळच्या डिलाईल रोडवर अनेक गावांच्या मंडळांच्या खोल्या आहेत. या खोल्यांची संख्या जवळपास ३५० पेक्षा जास्त आहे. गावामधले अंतर्गत राजकारण आणि पैशांच्या लालसेपोटी आता या खोल्यांचं जणू अस्तित्वच धोक्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यतल्या बेकिनकेरे गावाची डिलाईल रोडवर असाणाऱ्या खोलीची अवस्था काहीशी अशीच आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक काळ या खोलीत गावकरी राहत आले, पण आता ही खोली काहीजण विकण्याचा घाट घालत आहेत. गिरणी कामगारांच्या काळापासून असणाऱ्या या खोल्या म्हाडामधून नावावर करुन घेताना मंडळाच्या नावावर होत नसल्याने खोलीतच रहीवाशी असणाऱ्या जेष्ठ व्यक्तीच्या नावावर करण्यात आली. पण आता त्याच व्यक्तींनी खोली विकायला काढली त्यामुळे खोलीत राहणाऱ्या तरुणांना बेघर होण्याची चिंता लागलेली आहे.

इतर खोल्यांचीसुद्धा हीच अवस्था

आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या मलिग्रे, नेसरी या गावांची पण हिच अवस्था आहे. ग्रामस्थ मंडळाची खोली म्हणून वर्षानुवर्षे अनेकजण या खोल्यांत राहत आले. पण अचानक हे नवे संकट ओढवल्यामुळे सगळेच संभ्रमात आहेत. खोली गेली की त्यावर अधिकार राहणार नाही, त्यामुळे एवढ्या मुलांचं भविष्य धोक्यात आलं आहे. डिलाईल रोडवर असणाऱ्या या छोट्याश्या खोलीत जवळपास १८ जण राहतात. अत्यंत दाटीवाटीच्या या जागेत कसेतरी दिवस घालवत हे तरुण आपली गुजराण करत आहेत. पण जी खोली हक्काची म्हणून पिढ्यानपिढ्या दिवस घालवले तीच खोली आता विकली जाणार म्हटल्यावर आता मुलांना चिंता लागलेली आहे.

- Advertisement -

शेजाऱ्यांना काय वाटतं?

गेल्या अनेक वर्षांपासून ही मुले याच खोल्यांमध्ये राहत आली आहेत. पण यांचा कधीही कोणाला त्रास होत नाही, उलट आम्हाला कधी गरज भासली तर ही मुले मदतीला धावून येतात. जुन्या पिढीने उदात्त हेतूने सुरु केलेल्या या सुविधेस आता वैयक्तिक लालसेचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. पण असे न होता यांना हिच हक्काची खोली कायम मिळावी ज्यामध्ये राहून हे गुजराण करतील.

मी आणि माझे सहकारी १५ वर्षांपासुन इथे राहत आहोत. गावाकडून येणारा एखादा नवीन मुलगा जरी असला तरी त्याची आम्ही राहायची इथेच सोय करतो. पण आता आमचाच हक्काचा निवारा हिसकावून घेतला तर एवढ्या सगळ्या मुलांना बेघर होण्याला फक्त हे जबाबदार राहतील. वडीलोपार्जित असणाऱ्या या खोलीमुळे अनेकांना मुंबईमध्ये स्वत:च स्थान निर्माण करता आले आहे. त्यामुळे हा निर्णय पुर्णपणे चुकीचा आहे मुलांच्या मनस्थितीचा त्यांनी विचार करावा. – बलराम सनदी, खोलीतील रहिवासी तरुण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -