घरताज्या घडामोडीमहापौर करण्यासाठी एक-एक नगरसेवकांना ३५-३५ लाख दिले, विनय कोरेंनी दिली चुकीची कबुली

महापौर करण्यासाठी एक-एक नगरसेवकांना ३५-३५ लाख दिले, विनय कोरेंनी दिली चुकीची कबुली

Subscribe

जनसुराज्य पक्षाचे नेते आणि आमदार विनय कोरे यांनी कोल्हापुरात आपल्या पक्षाचा महापौर करण्यासाठी नगरसेवकांना प्रत्येकी ३५-३५ लाख रुपये दिले असल्याची कबुली दिली आहे. मात्र भावनेच्या भरात झालेली ही मोठी चुक असल्याची भावना कोरे यांनी व्यक्त केली आहे. मात्र असे राजकारण बंद झाले पाहिजे असे विनय कोरे म्हणाले आहेत.

विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्यानिमित्त जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी आपल्या चुकीची कबुली दिली आहे. कोरे म्हणाले की, महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील काही वर्षांपुर्वी एकत्र होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि मी ( विनय कोरे) एकत्र होतो. कोल्हापुरात पक्षाचा माहापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला ३५- ३५ लाख रुपये देण्यात आले. महापौर माझ्या पक्षाचा झाला पण लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. माझ्याकडून भावनेच्या भरात ही चूक झाली होती. परंतु नागरिकांच्या मनामध्ये राजकारणाबद्दल तिरस्कार निर्माण होईल असे राजकारण बंद झाले पाहिजे असे आमदार विनय कोरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

नगरसेवकांना आपल्याकडे खेचून कोरे- मुश्रीफ गटाने महापालिकेमध्ये सत्ता स्थापन केली होती. १५ वर्षांपुर्वी महापालिकेमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता होती. मात्र नगरसेवकांना आपल्याकडे वळते करुन ही सत्तापालट करण्यात आली होती.

राज्यात बिनविरोध निवडणुका करण्याचा पायंडा पाडला जातोय असे नाही तर ज्या ठिकाणी मर्यादित मतदार आहेत. त्या ठिकाणी समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे असे मत विनय कोरे यांनी मांडले आहे. तसेच आता समन्वयाचं, विचाराच्या राजकारणाची आपण सुरुवात केली पाहिजे असा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. याचाच भाग म्हणून कोल्हापूर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे विनय कोरे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, नाशिक दौऱ्यादरम्यान साधणार कार्यकर्त्यांशी संवाद

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -