घरताज्या घडामोडीनाना पटोलेंच्या कामामुळे राष्ट्रवादी-शिवसेनेला त्रास होतोय, विनायक मेटेंचा आरोप

नाना पटोलेंच्या कामामुळे राष्ट्रवादी-शिवसेनेला त्रास होतोय, विनायक मेटेंचा आरोप

Subscribe

कौरव,पांडव कोण याचे मूल्यमापन भाजप करेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावरुन महाविकास आघाडीमध्ये नाराजी पसरली आहे. नाना पटोले यांनीही लोणावळ्यातील मेळाव्यात नाराजी व्यक्त केली होती. यानंतर महाविकास आघाडीत नाराजी असल्याचे उघडं झालं आहे. यावर वरोधी पक्ष भाजपकडून टीका करण्यात येत होत्या तर आता भाजपचा मित्र पक्षांकडूनही टीका करण्यात येत आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. नाना पटोले आपल्या पक्षासाठी काम करत आहेत हे शिवसेना आणि राष्ट्रवादीला पटत नसून त्यांना त्रास होत असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी म्हटलं आहे की, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला काही येत नाही. काँग्रेसनं नाना पटोले यांना प्रदेश अध्यक्षपदी नियुक्त केलं असून नाना पटोले आपले काम चांगल्याप्रकारे करत आहेत. काँग्रेसचं काम पाहून शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्रास होत आहे. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी हुशार पक्ष आहेत काँग्रेसला हाताशी धरून नाना पटोलेंची कोंडी करत असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

कौरव,पांडव कोण याचे मूल्यमापन भाजप करेल

केंद्रीय मंत्रिमंडळावरुन भाजपमध्ये पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पंकजा मुंडे यांनी काय विचार करायचा हा सर्वस्व त्यांचा प्रश्न असल्याचे मत विनायक मेटे यांनी व्यक्त केलं आहे. कौरव कोण आणि पांडव कोण याचं मुल्यमापन भाजप, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील करतील असे विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. भाजपच्या नेत्यांची भूमिका काय असेल हे त्यांना चांगले माहिती असेल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते अमित शाह हे निर्णय घेण्यास समर्थ आहेत अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसला सत्तेचा लाभ नाही

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची कोंडी होते आहे. काँग्रेस सत्तेत आहे परंतु सत्तेचा लाभ काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळत आहे. कार्यकर्त्यांना लाभ मिळत नसल्यामुळे ते नाराज झाले आहेत. नाना पटोले यांच्याकडे वारंवार कार्यकर्ते तक्रार करत आहेत. या तक्रारींवरुन नाना पटोले यांनी वस्तुस्थिती मांडली असल्याचे विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

खडसे सत्याचा सामना करतील

झोटिंग समितीचा अहवाल गायब झाल्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु होते. यावर विनायक मेटे यांनी म्हटलं आहे की, झोटिंग समितीचा अहवाल गायब झाला असेल असं वाटत नाही. मंत्रालयात अनेक अहवाल पडून असतात त्यामुळे हे जाणीवपुर्वक झालं असेल असे वाटत नाही. हा प्रशासनामधला दोष असे विनायक मेटे यांनी म्हटलं असून एकनाथ खडसे हे सत्याचा समाना करतील असा विश्वास मेटेंनी व्यक्त केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -