देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री, विनायक मेटेंचं मोठं वक्तव्य

vinayak mete

मागील अडीच वर्षाच्या काळात ठाकरे सरकारने केवळ भ्रष्टाचार केला आहे. सगळ्या समाजाच्या लोकांवर अन्याय करण्याचे काम देखील सरकारने केले आहे. आपल्याला कोणी न्याय देणारं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री आहात, असं वक्तव्य शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री

मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले आहे. यावेळी या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आदी. देखील उपस्थित होते. अडीच वर्षाच्या काळात मी अनेक मोर्चे काढले. पण महाविकास आघाडीने यावर कधीही लक्ष दिलं नाही. आरक्षण देण्याचं काम तुम्ही केलं. मागील सरकारने एकाही समाजाला न्याय दिला नाही. आपल्याला कोणी न्याय देणारं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री आहात, असं विनायक मेटे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हेच सुपर सीएम…

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सुपर सीएम असल्याची चर्चा सुरू होती. यावर मेटेंनी आपलं मत व्यक्त केलं असून नवे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. परंतु कोणत्याही सरकारमध्ये सुपर सीएम नसतो. आमच्याकडेही नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आणि आमचे नेते आहेत. काहींना हे बघवत नाहीये म्हणून ते टीका करत आहेत, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र, त्यानंतरही विनायक मेटेंनी आज पुन्हा तेच वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात गदारोळ होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : सत्तांतरानंतर संजय राऊत हे बावचळलेत, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला