भाजपने आम्हाला काय फक्त वापरून घेतले का?, विनायक मेटेंची संतप्त प्रतिक्रिया

Vinayak Mete is angry with BJP for not getting the nomination for the Legislative Council

भाजपने विधानपरिषदेसाठी आपले 5 उमेदवार जाहीर केले आहेत. यानंतर भाजपच्या घटकपक्षांमध्ये नाराजी दिसत आहे. यानंतर भाजचा घटक पक्ष शिव संग्रामचे नेते विनायक मेटे उमेदवारी नाकारल्याने नाराज आहेत. त्यांनी भाजपने आम्हाला काय फक्त वापरून घेतले का? असा प्रश्न विचारला आहे. ते आज संध्याकाळी वरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांची भेट घेणार आहेत.

राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी भाजपने 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यात प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरश खापरे यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, पंकाजा मुंडे, चित्रा वाघ, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत यांना डावलण्यात आले आहे. यामुळे विनायक मेटे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने आम्हाल वापरून घेतले का असा प्रश्न त्यांनी केला आहे.

संध्याकाळी विनायक मेटे भूमिका स्पष्ट करणार –

विनायक मेटे संध्याकाळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान भाजपच्या यादीत 2014 पासून मित्र पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे नाव नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात त्यांना मंत्रीपदाची संधीही मिळाली नव्हती. तसेच इतर निवडणुकीतही त्यांना वाटा मिळाला नसल्याची तक्रार त्यांच्या कार्यकर्त्यांनी या आधीही केली होती.

दहाव्या जागेसाठी भाजप आणि मविआमध्ये चुरस –

राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 जूनला निवडणूक होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. आता दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस वाढणार आहे.