Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना भेटण्यापुर्वी निर्णय घ्यायला पाहिजे होते, विनायक मेटेंची टीका

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना भेटण्यापुर्वी निर्णय घ्यायला पाहिजे होते, विनायक मेटेंची टीका

मुख्यमंत्र्यांनी मोदींची भेट घेण्यापुर्वी मराठा तरुणांची प्रलंबित नियुक्ती मार्ग लावले पाहिजे होती, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी होती.

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांसह दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा होणार आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरुन भाजप नेत्यांनी निशाणा साधला आहे. पंतप्रधा मोदींची भेट घेण्यापुर्वी मुख्यमंत्र्यांनी आपल्या आखत्यारितीत काही निर्णय घेण्याची आवश्यकता होती. तसेच मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काय चर्चा करणार कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार याविषयी जनतेला समजायला पाहिजे होते असे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी म्हटले आहे.

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे -पंतप्रधान मोदींच्या भेटीवर भाष्य केले आहे. या भेटीचे स्वागत करत आम्ही मराठा मोर्चा काढला असल्यामुळे सरकारला जाग आली असल्याचे विनायक मेटे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी मोदींची भेट घेण्यापुर्वी त्यांच्याअंतर्गत येणारे निर्णय घेण्याची आवश्यकता होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान मोदींवर चर्चा करणार आहे. परंतु नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा करणार आणि काय मागण्या करणार याबाबत जनतेला अवगत करायला हवे होते असे वक्तव्य विनायक मेटे यांनी केले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी मोदींची भेट घेण्यापुर्वी मराठा तरुणांची प्रलंबित नियुक्ती मार्ग लावले पाहिजे होती, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी होती. ओबीसी समाजाप्रमाणे मराठ्यांना सोयी द्यायला पाहिज होत्या या सर्व हातातील गोष्टी राज्य सरकारने न करता पंतप्रधानांची भेट घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जात असल्याचे विनायक मेटे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर मराठा समाजाचं लक्ष

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान कार्यालयाला पंतप्रधान मोदींनी भेटण्याची विनंती केली होती. भेटीची विनंती स्विकारुन मंगळवारी भेटण्याची वेळ दिली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव, आणि राष्ट्रवादी, काँग्रेसमधील प्रमुख नेते दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय चर्चा होणार याकडे साऱ्या मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -