घरताज्या घडामोडीकाँग्रेसनं वडेट्टीवार यांना जातीयवाद भडकवण्याचं काम दिलंय, विनायक मेटेंचा घणाघात

काँग्रेसनं वडेट्टीवार यांना जातीयवाद भडकवण्याचं काम दिलंय, विनायक मेटेंचा घणाघात

Subscribe

राज्य सरकारने पावलं उचलली नाही तर २३ तारखेपासून अहमनगरमध्ये आमचं आंदोलन सुरु होईल

मराठा आरक्षणावरुन विनायक मेटे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या मागण्या पुर्ण झाल्या नाही तर अहमदनगरमध्ये धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात येईल असे विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. राज्य मागासवर्य आयोग आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार जातीयवाद असल्याचा आरोप विनायक मेटेंनी केलं आहे. काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांना जातीयवाद भडकवण्याचं काम दिलं असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. मेटेंनी आज मराठा समाजाच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करुन राज्य सरकारला इशारा दिला आहे.

शिवसंग्राम आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आलं. धरणे आंदोलन करुन मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान धरणे आंदोलन करुन राज्य सरकारला इशारा देण्यात आला आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास २३ तारखेपासून अहमदनगरमध्ये आंदोलनाला पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल असा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

- Advertisement -

मागासवर्गीय आयोग आणि विजय वडेट्टीवार जातीयवाद असल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. आम्ही या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला इशारा देण्याचं काम केलं आहे. राज्य सरकारने पावलं उचलली नाही तर २३ तारखेपासून अहमनगरमध्ये आमचं आंदोलन सुरु होईल असे वक्तव्य विनायक मेटे यांनी केलं आहे.

जातीयवाद भडकवण्याचं काम

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसनं जातीयवाद भडकवण्याचे काम दिलंय. मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये कशी भांडण लागतील. हेच काम विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपवलं आहे. काँग्रेसनं ते केलं आहे. मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. सत्ता आणि खुर्ची सांभाळण्यासाठी हे सर्व सुरु आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवारांनी हे बंध नाही केलं तर त्यांना याची किंमत चुकवावी लागेल असा इशाराच विनायक मेटेंनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  राजू शेट्टींना विधान परिषदेवर नियुक्त करण्यात अडचण?, अजित पवारांनी केलं सूचक वक्तव्य


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -