Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सरकारची गुंडगिरी सहन करणार नाही, बैठकीत शिवसैनिकांनी केलेल्या राड्यावरुन विनयाक मेटेंचा इशारा

सरकारची गुंडगिरी सहन करणार नाही, बैठकीत शिवसैनिकांनी केलेल्या राड्यावरुन विनयाक मेटेंचा इशारा

जर पक्षात गुंड ठेवून मराठा समाजाला घाबरवण्याचा प्रयत्न करणार असाल तर समाज उसळी मारल्याशिवाय राहणार नाही.

Related Story

- Advertisement -

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक घेतली होती. यावेळी बैठकीमध्ये काही शिवसैनिकांनी गोंधळ घालून बैठक बंद पाडली यामुळे विनायक मेटे यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकारची गुंडगिरी सहन करणार नाही. आम्ही गप्प बसलोय याचा अर्थ आम्ही बांगड्या भरल्या आहेत असा होत नाही अशा तीव्र शब्दांत विनायक मेटे यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसंग्रामच्या मेळाव्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु शिवसैनिकांनी केलेल्या राडा घालत भाजप सरकार सत्तेत असताना प्रश्न का सोडवला नाही? असे सवाल विनायक मेटेंना करण्यात आले.

औरंगाबादमधील पडेगावमध्ये शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु होती. या बैठकीत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेही उपस्थित होते. परंतु अचानक शिवसैनिक या ठिकाणी आले आणि बैठकीत गदारोळ झाला. भाजप सरकार असताना प्रश्न का सोडवण्यात आला नाही? असा सवाल शिवसैनिकांनी केला. यानंतर मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. सरकारी गुंडगिरी असून कुणाच्यातरी सांगण्यावरुन सरकारकरचे गावगुंड बैठकीत शिरले आणि मारामारी केली असा आरोप मेटे यांनी केला आहे.

विनायक मेटेंचा हल्लाबोल

- Advertisement -

राज्यताल मराठा समाज मुघलांना, इंग्रजांनाही घाबरला नाही. मराठ्यांना घाबरवण्याची कोणामध्ये औकात नाही. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जर पक्षात गुंड ठेवून मराठा समाजाला घाबरवण्याचा प्रयत्न करणार असाल तर समाज उसळी मारल्याशिवाय राहणार नाही. २६ जूनला आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचाच भाग म्हणून मेळावा घेण्याबाबत बैठक सुरु होती. परंतु या बैठकीत काही सरकारी पक्षाच्या गुंडांनी प्रवेश केला. कुणाच्यातरी सांगण्यावरुन हे गुंड काम करत आहेत. बैठकीत शहराअध्यक्ष यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली असल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले.

- Advertisement -