घरमहाराष्ट्रअनिल जयसिंघानीला मातोश्रीवर आणणारे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर; खासदार विनायक राऊतांचा दावा

अनिल जयसिंघानीला मातोश्रीवर आणणारे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर; खासदार विनायक राऊतांचा दावा

Subscribe

मुंबईः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या अनिल जयसिंघानियाला मातोश्रीवर आणणारे आता मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले आहेत, असा खळबळजनक आरोप खासदार विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता सोमवारी केला.

खासदार विनायक राऊत म्हणाले, अमृता फडणवीस व अनिक्षा जयसिंघांनीमध्ये चांगले संबंध होते याची कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिली आहे. याच प्रकरणात अटक झालेला अनिल जयसिंघानी मातोश्रीवर आला होता. उद्धव ठाकरे यांना तो भेटला. या भेटीचे फोटो काही भाजपवाले दाखवत आहेत. या अनिल जयसिंघानीला मातोश्रीवर आणणारा कोण आहे याचे उत्तर सुषमा अंधारे यांनी दिले आहे. जयसिंघानीला मातोश्रीवर आणणारे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसले आहेत, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

दरम्यान अनिल सिंघानियाला मुंबई पोलिसांना गुजरातहुन अटक केली. या अटकेचा थरार मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन विषद केला. गुन्हे शाखेने सहआयुक्त गुन्हे यांच्या नेतृत्त्वाखाली पाच पथके तयार केली होती. सायबर गुन्ह्यांची तीन पथके, सीआयूचे १ पथक आणि गुन्हे शाखा युनिट १० चे १ पथकाचा यात समावेश करण्यात आला होता. अनिल जयसिंघानी गेल्या अनेक वर्षांपासून फरार होता. त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात १५ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्या शोधासाठी हे पाचही पथक विविध राज्यात तपासासाठी पाठवण्यात आली होती. या तपासादरम्यान पोलिसांना सुगावा लागला. आरोपी गुजरातमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

अनिल जयसिंघानी महाराष्ट्रातून शिर्डी, शिर्डीतून गुजरातच्या बारदोली येथे पोहोचल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे तीन पथक गुजरातमध्ये पाठवण्यात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने सुरत पोलीस, सुरत ग्रामीण पोलीस, गोध्रा, बरोच, बडोदरा पोलिसांशी समनव्य करून ऑपरेशन गुजरातमध्ये राबवले. हा आरोपी ७२ तास पोलिसांना चकवा देत होता. तो बारदोली येथे कसल्याची माहिती मिळाली म्हणून पोलीस तेथे पोहोचले. पण तो तेथून निसटला. आरोपी नंतर सुरतमध्ये गेला, तिथेही पोलिसांनी सापळा रचला, परंतु, तो तिथूनही पोलिसांच्या हातून निसटला. पोटदारा, भरोच, वडोदरा या मार्गे तो गोध्रा या ठिकाणी पळून जात असताना ७२ तासांच्या थरारानंतर रात्री पावणे बाराच्या सुमारास नाकाबंदी करून गोध्राजवळील कलोल येथे गुजरात पोलिसांच्या मदतीने त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या, असा थरार गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सांगण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -