घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस, विनायक राऊतांची माहिती

पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस, विनायक राऊतांची माहिती

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चांगली मैत्री असल्याचे आपण नेहमी ऐकले आहे. बुधवारी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असल्याची माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. राज्याचे विधिमंडळ अधिवेशन बुधवारपासून सुरु झालं आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार का? असाही सवाल मोदींनी विचारला असल्याचे विनायक राऊत म्हणाले.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली असल्याची माहिती दिली आहे. विनायक राऊत म्हणाले की, संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदीच्छा भेट घेण्यासाठी आम्ही काही खासदार गेलो होतो. पंतप्रधान कार्यालयात झालेल्या भेटीनंतर मोदींनी नमस्कार केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत कशी आहे? ते विधानसभेत जाणार आहेत का? अशी चौकशी केली असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्यातील भाजप नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरुन टीका करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांची उंची राज्यातील भाजप नेत्यांमध्ये कधीच येणार नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील नातं कळणार नाही असेही विनायक राऊत म्हणाले आहेत.


हेही वाचा : Maharashtra Assembly Winter Session 2021: सरकारचा त्यांच्याच आमदारांवर विश्वास नाही – फडणवीस

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -