घरताज्या घडामोडीशिंदेंना विधानसभेची उमेदवारी मिळाली याचा मला पश्चाताप, विनायक राऊतांची खोचक टीका

शिंदेंना विधानसभेची उमेदवारी मिळाली याचा मला पश्चाताप, विनायक राऊतांची खोचक टीका

Subscribe

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर विधीमंडळात बहुमताचा ठराव मंजूर झाला. त्यामुळे शिंदे गट-भाजप सरकार अस्तित्वात आलं. तसेच मागील दोन दिवसीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जोरदार भाषणं देखील ठोकली. परंतु मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर शिवसेनेकडून प्रचंड प्रमाणात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, शिंदेंना विधानसभेची उमेदवारी मिळाली याचा मला पश्चाताप होतोय, अशी खोचक टीका विनायक राऊत यांनी शिंदेंवर केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावे लागेल. कुणीतरी लिहून देतं म्हणून ट्विट करायचं. स्वत: च्या हाताने ट्विट करता येतं का?, याचा शोध घ्यावा लागेल. एकनाथ शिंदे यांना माझ्या मध्यस्थिमुळे विधानसभेची उमदेवारी मिळाली त्याचा पश्चाताप होतो आहे. आयुष्यात मोठं पाप झालंय. मी सांगितलं नसतं तर शिंदेंना आमदारकी मिळाली नसती, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती, रिक्षाला ब्रेकच लागत नव्हता, असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला होता. परंतु एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून रिक्षाच्या स्पीड पेक्षा मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, असा पलटवार शिंदेंनी ठाकरेंवर केला.

दरम्यान, शिवसेनेचे ४० आमदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता खासदार देखील शिंदे गटात सामील होणार असल्याचं सांगितलं जात आहे. १८ पैकी १२ खासदार हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. तर २२ माजी खासदार देखील त्यांच्या संपर्कात असल्याचं शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबईत वादळी पाऊस, हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -