घरताज्या घडामोडीराऊतांनी लावला फडणवीसांकडून राणेंवरील आरोपांचा पाढा वाचणारा तो व्हिडीओ, 300 कोटींचा घोटाळा...

राऊतांनी लावला फडणवीसांकडून राणेंवरील आरोपांचा पाढा वाचणारा तो व्हिडीओ, 300 कोटींचा घोटाळा आणला समोर

Subscribe

राणेंचा मनी लॉन्ड्रिंगमध्ये कशा संबंध आहे याबाबतची माहिती किरीट सोमय्या यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणें यांच्याविरोधात असणाऱ्या आरोपांचा पाढाच वाचणारा व्हिडिओ शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लावला आहे. तसेच ३०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार अविघ्न पार्कमध्ये केला असल्याचा आरोप भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता त्याचाही व्हिडिओ विनायक राऊत यांनी दाखवत राणेंवर पलटवार केला आहे. नारायण राणेंनी दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत याचा खून झाल्याचा आरोप केला आहे. तसेच या हत्या प्रकरणामध्ये एका मंत्र्याचाही समावेश असल्याचे राणे म्हणाले. तसेच महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत यावरुन विनायक राऊतांनी भाजप नेत्यांकडून राणेंवर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे विस्मरण करुन देण्यात आले आहे.

खासदर विनायक राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन लाव रे तो व्हिडिओ करत केंद्रीय मंत्री नारायण राणेंची चांगलीच पोलखोल केली आहे. पहिल्या व्हिडीओमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राणेंविरोधाती गुन्ह्यांचा पाढाच वाचला आहे. नारायण राणे यांच्या कार्यकाळात सिंधुदुर्गात अनेक हत्या झाल्या, खंडणी , मारामारी झाली. तब्बल ९ वर्षे हा सगळा प्रकार सुरु होता. श्रीधर नाईक यांच्या खुनातील प्रत्यक्ष आरोपी कोण होता ? असा सवाल विनायक राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

लाव रे तो व्हिडीओकरत विनायक राऊतांनी पहिला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा जुना व्हिडीओ लावला. विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी नारायण राणे यांच्याविरोधात असलेल्या आरोपांची कुंडली वाचली होती. तसेच ज्यांचे घर काचेचं असतं त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारु नये असा इशाराच फडणवीसांनी राणेंना दिला आहे. तसेच सिंधुदुर्गात जे खून आणि मारमाऱ्या झाल्या त्या सर्वाची माहितीच फडणवीसांनी विधानसभेत वाचून दाखवली असल्याचे त्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. दरम्यान विनायक राऊत या प्रकरणांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन पुन्हा चौकशी करण्याची मागणी करणार आहेत.

अविघ्न पार्क इमारतीमध्ये राणेंकडून ३०० कोटींचा घोटाळा

दुसऱ्या व्हिडीओमध्ये माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एका अविघ्न पार्क इमारतीमध्ये राणेंनी ३०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. सोमय्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. राणेंचा मनी लॉन्ड्रिंगमध्ये कशा संबंध आहे याबाबतची माहिती किरीट सोमय्या यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : गोवेकर, भिसे, अंकुश राणे, श्रीधर नाईकांच्या खुनामागे कोण?, विनायक राऊतांचा राणेंवर पलटवार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -