Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ७ ऑक्टोबरला सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून विमानाचे उड्डाण

७ ऑक्टोबरला सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून विमानाचे उड्डाण

अजून डीजीएसएची परवानगी नाही - नितेश राणे

Related Story

- Advertisement -

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून येत्या ७ ऑक्टोबर रोजी विमानाचे उड्डाण करील, अशी माहिती सिंधुदुर्गाचे खासदार विनायक राऊत यांनी दिली होती. मात्र, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी त्यावर टीका केली आहे.
चिपी विमानतळासाठी अजूनही डीजीएसएची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ही 7 तारीख कोठून आणली आहे. हे काय कागदाचे विमान उडवणार आहेत का? असा खोचक सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
चिपी विमानतळावरून मागील काही दिवसांपासून राणे आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू आहे.

त्यातच येत्या 7 ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचे उड्डाण सुरू होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. त्यांच्या या माहितीनंतर कोकणवासीयांनी आनंद व्यक्त केला. मात्र, राऊत यांच्या घोषणेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊत यांचा समाचार घेतला. चिपी विमानतळावरून विमानोड्डाण करण्यासाठी अजून डीजीएसएची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ही ७ तारीख त्यांनी कोठून आणली आहे. ते एकटे राहून कागदाचे विमान उडवणार आहेत का? असे नितेश राणे म्हणाले.

- Advertisement -

तसेच पुढे बोलताना राणे यांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणात सोडलेल्या रेल्वेगाड्यांबद्दल भाष्य केलं. येत्या 7 तारखेला मोदी एक्स्प्रेस सुटेल. दादरहून 11 डब्यांची ही रेल्वे 1800 प्रवाशांना घेऊन जाईल. ज्यांना पास दिलेले आहेत, तेच या रेल्वेतून प्रवास करतील. शासनाने जे नियम घालून दिले आहेत त्यानुसार नियोजन केले आहे. नारायण राणे यांना भाजपने सन्मानाने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलेले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पाहिजेत, अशी सर्वांची इच्छा आहे. त्यासाठीच ही मोदी एक्स्प्रेस आहे, असे नितेश राणे म्हणाले.

- Advertisement -