घरमहाराष्ट्रVinod Ghosalkar : आमचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र; विनोद घोसाळकरांचा आरोप

Vinod Ghosalkar : आमचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र; विनोद घोसाळकरांचा आरोप

Subscribe

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी मॉरिस नोरोन्हा याने गोळ्या झाडून हत्या केली. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर आज उद्धव ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकर यांचं हे निवेदन प्रसिद्धीस दिलं आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळ यांच्या हत्येनंतर त्यांचे वडील माजी आमदार विनोद घोसाळकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने झालेली हत्या हा आमच्यावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य असे बिनबुडाचे आरोप करून आमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Vinod Ghosalkar Conspiracy to destroy our political life Vinod Ghosalkars allegation)

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी मॉरिस नोरोन्हा याने गोळ्या झाडून हत्या केली. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर आज उद्धव ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकर यांचं हे निवेदन प्रसिद्धीस दिलं आहे. या निवेदनात विनोद घोसाळकर यांनी विश्वासानं इतकी वर्षं जनतेची सेवा केल्याचं नमूद केलं आहे. 1982 पासून मी सक्रिय राजकारणात आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या सूत्राचे तंतोतंत पालन करत आहे. मी आणि माझा पुत्र अभिषेक आम्ही निरपेक्षपणे आणि निष्ठेने राजकारण आणि समाजकारण केले आहे. शिवरायांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. निष्कलंकपणे आम्ही सामाजिक जीवनात वावरत आहोत. कोणताही डाग आमच्यावर नाही असं घोसाळकरांनी निवेदनात म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Maghi Ganesh Jayanti : ‘या’ कारणामुळे साजरा केला जातो माघी गणेशोत्सव

ही बदनामी कृपा करून तत्काळ थांबवा

पुढे निवेदनात म्हटलं आहे की, माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने झालेली हत्या हा आमच्यावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य असे बिनबुडाचे आरोप करून आमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार सुरू आहे. ही बदनामी कृपा करून तत्काळ थांबवा, अशी माझी कळकळीची विनंती आहे, असं आवाहन विनोद घोसाळकर यांनी केलं आहे. आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार नोंदवा. पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे असेही विनोद घोसाळकर यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Sharad Pawar Funda : पक्षाचे नाव ठरविताना 25 वर्षांपूर्वीचीच चाल; राष्ट्रवादीवर पवारांचीच छाप

नेमकं प्रकरण काय ?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी (ता. 08 फेब्रुवारी) रात्री हत्या करण्यात आली. दहिसर-बोरिवली येथील सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेला मॉरिस नोरोन्हा याने फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच घोसाळकरांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली. पण धक्कादायक बाब म्हणजे मॉरिसने यानंतर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -