Homeक्रीडाVinod Kambli : सचिन तेंडुलकर सोबतच्या नात्यावर विनोद कांबळीकडून खुलासा; म्हटले...

Vinod Kambli : सचिन तेंडुलकर सोबतच्या नात्यावर विनोद कांबळीकडून खुलासा; म्हटले…

Subscribe

मागे एकदा वाईट काळात सचिनने आपल्याला मदत केली नसल्याचा आरोप त्याने केला होता. मात्र आता विनोद कांबळी याने सचिन तेंडुलकर सोबतच्या नात्यावर खुलासा केला आहे.

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह असंख्य क्रिकेटपटूंचे दिग्गज प्रशिक्षक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचं 3 डिसेंबर रोजी दादर येथील शिवाजी महाराज पार्कमध्ये अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला भारतातील टॅलेंटेड क्रिकेटपटू म्हणून ओळख असलेला विनोद कांबळी सुद्धा उपस्थित होता. सतत दारु प्यायल्यामुळे विनोद कांबळी सध्या विपण्णावस्थेत आहे. मागे एकदा वाईट काळात सचिनने आपल्याला मदत केली नसल्याचा आरोप त्याने केला होता. मात्र आता विनोद कांबळी याने सचिन तेंडुलकर सोबतच्या नात्यावर खुलासा केला आहे. (Vinod Kambli opens up about his relationship with Sachin Tendulkar)

एका मुलाखतीदरम्यान, विनोद कांबळी याला सचिनने तुला कधीच मदत केलीच नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने आपली चूक कबूल केली. त्याने म्हटले की, वाईट काळात सचिनने आपल्याला मदत केली नसल्याचे म्हटले होते. पण तेव्हा मी नैराश्यात होतो. पण सचिनने मला दोनदा सर्जरीसाठी मदत केली आहे. त्याच्यामुळे मी 9 वेळा भारतीय संघात पुनरागमन करू शकलो. मी जेव्हा जेव्हा संघात पुनरागमन केले, तेव्हा तेव्हा सचिनने मला पिचवर कसं टिकून राहायचं हे सांगितलं. त्यामुळे आता सचिन आणि माझ्यात चांगले संबंध आहेत. आमच्यात सर्व काही ठिक झाले आहे. आम्ही चांगले मित्र आहोत, अशी भावना विनोद कांबळी याने बोलून दाखवली.

हेही वाचा – ICC Champions Trophy 2025 : अखेर हाइब्रिड मॉडलला मान्यता; भारताचे सामने कुठे? जाणून घ्या…

याचपार्श्भूमीवर सचिनने कशी मदत केली? असा प्रश्न विनोद कांबळी याला विचारण्यात  आला. यावर तो म्हणाला की, आम्ही क्रिकेटपटू आहोत. त्यामुळे एखाद्या गोष्टीने आम्ही लगेच दुखावलो जातो. जेव्हा आम्ही बाद होतो, तेव्हा आमच्या मनाला लागतं. पण सचिनने माझ्यासाठी सर्व काही केलं आहे. लिलावती रुग्णालयात 2013मध्ये माझ्यावर दोन सर्जरी झाल्या. त्यावेळी सचिनने मला मदत केली. भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठीही सचिननेच मदत केली होती. मागे मुलाखतीत मी नैराश्यात असताना सचिनने मदत केला नसल्याचा आरोप केला होती. तसे वक्तव्य मी सह केले होते. पण त्यानंतर मला माझी चूक लक्षात आली आणि मी सचिनला फोन केला. त्यानंतर आमच्या पुन्हा एकदा चांगली घट्ट मैत्री झाली, असेही विनोद कांबळी म्हणाला.

हेही वाचा – SMAT 2024 : दोन धावांनी शतक हुकले, पण रहाणेच्या तुफान फटकेबाजीमुळे मुंबई फायनलमध्ये


Edited By Rohit Patil