Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरVinod Tawde : पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तरी विनोद तावडेंनी... विवांता हॅाटेलचा...

Vinod Tawde : पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तरी विनोद तावडेंनी… विवांता हॅाटेलचा आणखी एक व्हिडिओ समोर

Subscribe

विरारच्या विंवाता हॅाटेलमधील भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये विनोद तावडे पोलिसांना दहा मिनिटे बोलू द्या असे म्हणत आहेत.

वसई : ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सगळीकडे खळबळ माजली आहे. दोन दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंना विरारच्या एका हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना पकडल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांनतर हे प्रकरण राज्याभरात वाऱ्यासारखे पसरले आहे. त्यातच आता या प्रकरणाचा आणखी एक व्हिडिओ समोर आल्याचे बोलले जात आहे. विरारच्या विंवाता हॅाटेलमधील हा व्हिडीओ असून विनोद तावडे एका सभागृहात सभा घेत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं आहे की, पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असतानाही विनोद तावडे यांनी दहा मिनिटे बोलू द्या असे पोलिसांना सांगत आहेत. (Another video of vinod tawde from vivanta hotel in virar.)

हेही वाचा : Maharashtra Election 2024 : लोकशाहीवर दबाव आणण्याचा हा प्रकार, ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल

- Advertisement -

या व्हिडीओमध्ये पोलिसांनी तावडेंना सभा घेताना थांबवण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र तरी सुद्धा तावडे पोलिसांना दहा मिनिटे बोलू द्या असे सांगत आहे. यावेळी कार्यकर्त्यांसोबत चहा घेत असल्याचे कारण पुढे करत त्यांनी सभा घेतली आहे. त्यानंतर त्यांना माध्यामांनी विचारले असता त्यांनी मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करत असल्याचे कारण दिले होते. या प्रकरणावरून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील गोंधळ घातल्याचे दिसून आले आहे. तसेच विनोद तावडे यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. निवडणूक आयोग आणि कायदा याकडे दुर्लक्ष करत विनोद तावडेंनी कार्यकर्त्यांसमोर भाषण ही केल्याचे या प्रकरणात दिसून आले आहे. या प्रकरणी आता बहुजन विकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे कारवाईची ही मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी सीसीटीव्ही तपासा तसेच आयोगकडून चौकशी होऊ द्या अशी प्रतिक्रिया विनोद तावडेंनी दिली आहे.

हेही वाचा : Maharashtra Election 2024 : संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक; मतदान संपताच का केली कारवाई?

- Advertisement -

या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाचे एक पथक घटनास्थळी पोहचले. त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या पथकाला 9 लाख 93 हजार 500 रुपये सापडले आहेत. त्याचबरोबर इतर कागदपत्रे देखील सापडले आहेत. त्या पद्धतीने कार्यवाही सुरू असून पोलिसांनी सुद्धा तक्रार दाखल केली आहे. या हॉटेलची पूर्ण तपासणी करून त्याबाबतीत पूर्ण कारवाई करण्यात येईल, असे पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी माहिती दिली आहे.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -