Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Vinod Tawde : पुन्हा भाजपची ऑफर; नाथाभाऊंनी परत आलं पाहिजे, पण...

Vinod Tawde : पुन्हा भाजपची ऑफर; नाथाभाऊंनी परत आलं पाहिजे, पण…

Subscribe

 

मुंबईः नाथाभाऊंनी (एकनाथ खडसे) परत आलं पाहिजे. पक्षात अशाप्रकारच्या लिडरशीपची गरज आहेच, अशी ऑफर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस Vinod Tawde यांनी दिली. एका वेबसाईडला दिलेल्या मुलाखतीत Vinod Tawde यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

- Advertisement -

Vinod Tawde म्हणाले, नाथाभाऊंसारख्या ज्येष्ठ लोकांनी परत यावं. पण येताना ते ज्या पद्धतीने स्पष्टपणे बोलतात ते अपेक्षित नाही. जी जी माणसं पक्षात आली पाहिजे असं आम्हाला वाटतं त्यात नाथाभाऊ आहेत. कारण त्यांना ग्रामीण महाराष्ट्राची चांगली ओळख आहे.

हेही वाचाः माझ्या राजकीय जीवनातला… ठाण्यातील क्लस्टरच्या कामावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

- Advertisement -

खडसे परत येणार असतील तर फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे आणि अन्य नेत्यांशी बोलून योग्य तो निर्णय घेतील. परत आल्यानंतर खडसे यांनी भाजपच्या शिस्तीचे पालन करायला हवे. भाजपवापसी संदर्भात माझे खडसे यांच्याशी किंवा पक्षश्रेष्ठींशी माझे बोलणे झालेले नाही, असेही Vinod Tawde यांनी स्पष्ट केले.

Vinod Tawde यांनी मुलाखतीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचीही आठवण करुन दिली. ज्यांच्यावर अन्याय होतो, त्यांच्याकडे संयम असायला हवा. विलासराव देखमुख यांना विधानपरिषदेसाठी भाजपने मदत केली. शिवसेनेने मदत केली नाही. शिवसेनेने मदत केली असती तर निवडून पण आले असते. सन २००४ ला झाले ना ते मुख्यमंत्री, असे Vinod Tawde यांनी मुलाखतीत सांगितले.

२०१९ च्या निवडणुकीत शिवसेना दगा देईल असं वाटलं नव्हतं. बाळासाहेब दिलेला शब्द पाळायचे. शब्द पाळणे ही शिवसेनेची ओळख होती. ही ओळखच उद्धव ठाकरे यांनी पुसून टाकली. याचा त्यांना अल्पवधीसाठी लाभ झाला. मात्र पुढे त्यांचे नुकसानच झाले, असा दावाही Vinod Tawde यांनी केला.

Vinod Tawde च्या अहवालाने उडवली होती खळबळ

आगामी काळात २०२४ मध्ये लोकसभेसह अनेक निवडणुका पार पडणार आहे. दरम्यान, २०२४ मध्ये भाजपच्या जागा घटणार असल्याचा अहवाल भाजप नेते विनोद तावडे यांच्या समितीने केंद्रीय नेतृत्वाला दिल्याचं सांगितलं जात आहे. या अहवालामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या सर्व प्रकरणावर विनोद तावडे यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं होतं. एप्रिल २०२३ मध्ये हा अहवाल सादर झाला. दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे -फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूतच झाली आहे, असं स्पष्टीकरण ट्विटद्वारे विनोद तावडे यांनी दिलं होत.

एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

जळगाव जिल्हयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोन ते तीन वेळा भाषण केले. परंतु भाषणात शिवसेनेतून बाहेर कसे पडलो, गुवाहाटीत कसे गेलो?, अशा एकच प्रकारची कॅसेट मुख्यमंत्र्यांकडून वाजत आहे, अशी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. हा कसा फुटला, तो कसा फुटला आणि आपण सरकारमध्ये कसे आलो? यावरच मुख्यमंत्री आपली कॅसेट वाजवत आहेत. जळगाव जिल्ह्यात अनेक समस्या आहेत. परंतु विकासाच्या प्रश्नांवर ते बोलतच नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले होते. जानेवारी महिन्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना हा टोला लगावला होता.

 

 

- Advertisment -