घरमहाराष्ट्र'लावारिस' म्हणणाऱ्या अवधूत वाघ यांना तावडेंनी झापले

‘लावारिस’ म्हणणाऱ्या अवधूत वाघ यांना तावडेंनी झापले

Subscribe

वधुत वाघ यांनी केलेले ट्विट हे आधीच्या ट्विटला उत्तर देताना झाल्याचे तावडे यांनी सांगत, मी अवधूत वाघ यांना कडक शब्दात समज दिल्याचे तावडे यांनी सांगितले.

अनेकदा आपल्या ट्विटवरून अडचणीत आलेले भाजपा प्रवक्ते अवधुत वाघ आज, शक्रवारी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे अडणचणीत आले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा लावारिस असा उल्लेख केल्यामुळे आता अवधुत वाघ यांची ट्रोलर आता चांगलीच शाब्दीक धुलाई करत आहेत. त्यामुळे भाजपा प्रवक्ते अवधुत वाघ यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपाला अडचणीत आणले की काय असा सवाल देखील उपस्थित होत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात, असे अवधूत वाघ यांनी ‘चौकीदार अवधूत वाघ’ या ट्विटरवरून केल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्या ट्विटवर त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे.

avdhut wagh tweet
अवधूत वाघ यांच ट्विट

वाघ यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली

मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरुन शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या असलेल्या पत्रकारांना ट्रोल करू नका असा इशारा देण्यात आला होता. यावर उत्तर देताना अवधूत वाघ यांनी आक्षेपार्ह भाषा वापरत पातळी सोडली. ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा’, असं उत्तर अवधूत वाघ यांनी दिले. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली. दरम्यान अवधुत वाघ यांच्या या वादग्रस्त ट्विटनंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यांना चांगलेच झापले असून, अवधुत वाघ यांनी केलेले ट्विट हे आधीच्या ट्विटला उत्तर देताना झाल्याचे तावडे यांनी सांगत मी अवधूत वाघ यांना कडक शब्दात समज दिल्याचे तावडे यांनी सांगितले. तसेच यापुढे अशा प्रकारे अशोभनिय भाषेचा वापर खपवून घेतला जाणार नाही असे विनोद तावडे यांनी त्यांना खडसावले. काही महिन्यापूर्वी नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार असल्याचे ट्विट अवधुत वाघ यांनी होते. तसेच हे ट्विट केल्यानंतर ट्विटरवर त्यांची येथेच्छ धुलाई देखील करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -