Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रVinod Tawde : विनोद तावडे प्रकरणावर भाजपची प्रतिक्रिया; बावनकुळे म्हणाले, विरोधकांनी एक...

Vinod Tawde : विनोद तावडे प्रकरणावर भाजपची प्रतिक्रिया; बावनकुळे म्हणाले, विरोधकांनी एक फिल्म तयार केली…

Subscribe

मुंबई – विधानसभा निवडणूक मतदानासाठी काही तास शिल्लक असताना विरार येथील एका हॉटेलमध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत त्यांना पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर आणि भाजपचे स्थानिक उमेदवर राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे चिरंजीव क्षितीज ठाकूर हॉटेलमध्ये येईपर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना पकडून ठेवले होते. भाजपचे राष्ट्रीय महासचिव मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटप करत असल्याच्या आरोपात पकडले जाणे हे भाजपसाठी नाचक्कीचे ठरत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिले आहे.

महाराष्ट्रातील भाजपच्या कोणत्याही बड्या नेत्याने दिवसभरात तावडे कांडावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नव्हती. सायंकाळी पाचच्या सुमारास भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करुन विरोधकांचे हे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, “विरोधकांनी षडयंत्र केले आणि तावडेंना त्यात अडकवले आहे. विरोधकांनी एक फिल्म तयारी केली, त्यात तावडे यांना अडकवले आहे. विरोधकांचे हे जाणीवपूर्वक षडयंत्र तयार केले. विनोद तावडे हे कोट्यवधी रुपये घेऊन नालासोपारा भागात आले आहेत. ते कोट्यवधी रुपये वाटणार आहेत, असे षडयंत्र रचले गेले.” असं बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

विनोद तावडे हे निष्कलंक असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की, विनोद तावडे हे राष्ट्रीय महासचिव आहेत. या पदावरील व्यक्ती असे पैसे वाटप करेल का? याचाही विचार केला पाहिजे. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळेच ते अशा प्रकारचा आरोप करत आहे. तपास यंत्रणा या सर्व प्रकाराचा तपास करत आहे. भाजप देखील याचा पर्दाफाश करेल असा दावा बावनकुळे यांनी केला.

काय झाले विवांता हॉटेलमध्ये

विनोद तावडे हे विवांता हॉटेलमध्ये रुम नं. ४०५ मध्ये होते. तिथे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते पोहचले त्यांनी तावडे यांच्या बाजूला असलेल्या डायरी आणि बॅगा तपासल्या. त्यामध्ये दहा लाक रुपये रोकड सापडल्याचा आरोप आहे. तावडेंविरोधात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये ९ लाख ९३ हजार ५०० रुपये सापडल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आणि उमेदवार क्षितीज ठाकूर यांनी तावडेंना घेरुन तिथेच पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये तावडे आणि भाजपवर पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. मला यातून सेफ बाहेर काढा असे 25 फोन तावडेंनी केले, असा दावाही ठाकूर यांनी केला. त्यानंतर ठाकूर यांच्या गाडीतूनच तावडे हॉटेलमधून बाहेर पडले.

- Advertisement -

तावडेंच्या अटकेची मागणी

काँग्रसेचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भाजप महासचिव विनोद तावडे यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. नालासोपारा येथील तावडे कांडाने भाजपचे चालचरित्र समोर आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा : Supriya Sule : तावडेंकडून ही अपेक्षा नव्हती…सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली खंत

Edited by – Unmesh Khandale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -