मुंबई : मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी (ता. 19 नोव्हेंबर) विरारमध्ये मोठा राजकीय राडा पाहायला मिळाला. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैशांच्या बॅगेसह बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले. यावेळी मोठा गोंधळ तर झालाच पण बविआच्या कार्यकर्त्यांनी भाजपा आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण देखील केली. बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी तर भाजपाच्याच नेत्यांनी विनोद तावडे पाच कोटी रुपये वाटपासाठी येत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या या आरोपांना दुजोरा देत सुप्रिया सुळे यांनी सुद्धा तावडेंसारख्या व्यक्तीकडून असे काही घडणे हे अस्वस्थ करणारे आहे, असे म्हटले होते. त्यांच्या या विधानाला आता विनोद तावडे यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (Vinod Tawde Why did say that Supriya Sule should pay me 5 crores?)
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी बुधवारी (ता. 20 नोव्हेंबर) पत्नीसोबत मतदानाचा हक्क बजावला. मुंबईतील विले पार्ले मतदारसंघावर त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी सुद्धा संवाद साधला. प्रसार माध्यमांनी तावडे यांना विरारमधील घटनेबाबत विचारले असतात ते म्हणाले की, पैसे वाटपाच्या विषयावर भाष्य करताना ते म्हणाले की, असा कुठल्याही प्रकारचा पैसे वाटण्याचा प्रकार तिथे झालेला नाही आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या सोबत चहापान करण्यासाठी तिथे गेलो होतो. परंतु तिथे भलताच प्रकार घडून आला. मी कुठल्याही पद्धतीचे पैसे वाटण्यासाठी तिथे गेलो नव्हतो आणि तसे काही झालेले नाही. यामागे कोणाची साजिश आहे काय हे अद्याप मला माहीत नाही, असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा… Maharashtra Assembly 2024 : महानगरपालिका आयुक्तांचे नागरिकांना आवाहन; म्हणाले…
तसेच, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाच कोटी सापडल्याचा दावा केला आहे. तो त्यांनी कुठून केला, कसा केला हे त्यांनाच माहीत. परंतु खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी सुप्रिया सुळेंवर क्रिप्टोकरन्सीबाबत जे आरोप लावले आहेत. मला इतकी माहिती आहे की, खासदार सुधांशू त्रिवेदी हे इतके अभ्यासू आहेत की त्यांच्याकडे पूर्ण सत्य माहिती असल्याशिवाय ते कधी असे आरोप करत नाहीत, असा टोलाही विनोद तावडे यांनी लगावला. मात्र, जर का माझ्याकडे 5 कोटी रुपये होते असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत, पण ते खोट आहे. त्यामुळे आता त्यांनी आधी माझे पाच कोटी रुपये परत द्यावे. असे विनोद तावडे यांच्याकडून प्रसार माध्यमांसमोर सांगण्यात आले आहे.
शरद पवारांचे मानले आभार…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रसार माध्यमांनी विनोद तावडे यांच्या पैसे वाटप प्रकरणाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी विनोद तावडे यांच्यावर झालेल्या गुन्ह्याची मला माहिती नाही. त्यामुळे माहिती घेऊन बोलणे योग्य राहील, असे म्हटले. ज्याबाबत विनोद तावडे यांना प्रसार माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, शरद पवार हे वरिष्ठ आणि परिपक्व नेते आहेत. ते राजकारणातील वरिष्ठ नेते आहेत. ते मला जवळून ओळखतात. मी असा प्रकार करणार नाही हे त्यांना माहीत आहे. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.