घरताज्या घडामोडीजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली

Subscribe

पहिल्याच दिवशी लॉकडाऊनचा फज्जा : सातनंतरही बाजारपेठा सुरू

जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सायंकाळी सात वाजेनंतर जनता कर्फ्यु घोषित केला आहे. बुधवारपासून या नियमांची अंमलबजावणीचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले. परंतु पहिल्याच दिवशी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली. सायंकाळी साडेसातनंतरही शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने सुरूच असल्याचे चित्र दिसून आले.

बुधवारी सायंकाळी सात वाजेनंतर शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार हे नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे दिसून आली. महात्मा गांधी मार्ग, मेनरोड, दहिपुल, भद्रकाली, गाडगे महाराज चौक, शालीमार येथील सर्व दुकाने सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती त्यामुळे पालिका तसेच पोलीस प्रशासनानेही ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचेच दिसून येते. त्यामुळे पहिल्याच दिवशी लॉकडाउनचा फज्जा उडाला.

- Advertisement -

पोलीसही विनामास्क
काही भागात सायंकाळी साडेसातनंतर पोलीस पथकाने बाजारपेठांमध्ये फेरफटका मारत व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. तसेच विनामास्क फिरणार्‍यांना मास्क वापरण्यास सांगितले मात्र स्वतः पोलीस कर्मचारी मात्र विनामस्क फिरत असल्याचे दिसून आल्यानंतर काही नागरीकांना त्यांना मास्क वापरण्याबाबत सल्ला दिला यावेळी पोलीस आणि नागरीकांमध्ये वाद निर्माण झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -