Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र हिंसाचार, नावे गायब आणि इव्हीएम मशिन

हिंसाचार, नावे गायब आणि इव्हीएम मशिन

Subscribe

 लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानावेळी देशभरात हिंसाचाराच्या दोन घटना घडल्या. अनेक मतदार केंद्रावर इव्हीएम मशिन बंद पडल्या. तर मतदार यादीत नावच नसल्याच्या तक्रारीने निवडणुक आयोग हैराण झाले. या घटना वगळता लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा शांततेत पार पडला. विशेषत: बस्तर आणि दंतेवाडा या नक्षलग्रस्त भागात भयमुक्त वातावरणात मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. देशभरात ६.८७ कोटी महिला आणि १४ लाख दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावलाअसे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या सात टप्प्यांपैकी पहिला टप्पात देशभरात ९१ लोकसभा मतदान संघात मतदान पार पडले. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. तर चंद्राबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, महबूबा मुक्ती यांसारख्या अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रवासकीय चुकीची तक्रार केली.

- Advertisement -

आंध्र प्रदेशमध्ये मतदानादरम्यान टीडीपी आणि वाईएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक हाणामारी झाली. त्यात दोन्ही पक्षाच्या एका-एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. दुसर्‍या हिंसाचाराच्या घटनेत गडचिरोली भागात नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. त्यात तीन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. नक्षलवाद्यांनी हा स्फोट मतदान संपल्यावर मतदान केंद्रापासून दूर केला. त्यामुळे स्फोटा मनुष्यहानी झाली नसल्याचे समजते.

पहिल्याच्या टप्प्याच्या मतदानानंतर निवडणूक आयोगाचे उपायुक्त उमेश सिन्हा यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. आम्ही देशभरातील पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पाडण्यात यशस्वी ठरलो आहोत. नक्षलग्रस्त दंतेवाडामध्ये कोणतीही गडबड होऊ नये म्हणून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्या भागातही भयमुक्त वातावरणात मतदान पार पडले. देशातील ९१ लोकसभा मतदारसंघात १.७ लाख मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी मतदानात भाग घेतल्याबद्दल आभार मानले आहेत. देशभरात ६.८७ कोटी महिला आणि १४ लाख दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

७१ हजार तक्रारी
गुरुवारी पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान, निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजिल अ‍ॅपवर लोकांनी ७१ हजार २६ तक्रारी केल्या. त्यापैकी ५० हजार ८०४ तक्रारींची दखल घेतल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.

बंदच्या घटनांसह निवडणुकीचा शुभारंभ

आंध्रप्रदेश (२५ जागा) : ६६ टक्के
छत्तीसगड (१ जागा) : ५६ टक्के
अंदमान निकोबार (१ जागा) : ७०.६७ टक्के
तेलंगणा (१७ जागा) : ६०.५७ टक्के
बिहार: ५०. २६ टक्के
मेघालय: ६२ टक्के
उत्तर प्रदेश: ५९.७७ टक्के
मणिपूर: ७८.२० टक्के
लक्षद्वीप: ६५.९ टक्के
आसाम: ६८ टक्के
उत्तराखंड (५ जागा) : ५७.८५ टक्के
जम्मू-काश्मीर (२ जागा) : ५४.४९ टक्के

- Advertisment -