घरताज्या घडामोडीNavratri 2021: तुळजाभवानी मंदिरात VIP दर्शन बंद, संस्थानाकडून नवीन नियमावली जाहीर

Navratri 2021: तुळजाभवानी मंदिरात VIP दर्शन बंद, संस्थानाकडून नवीन नियमावली जाहीर

Subscribe

तुळजापूर मंदिरात दररोज केवळ १५ हजार भाविकांना प्रवेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेल्या नियमांच्या आधारे राज्यातील मंदिरे घटस्थापनेच्या मुहूर्तावर दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे. मात्र मंदिरात होणाऱ्या VIP दर्शनाला लगाम घालण्यासाठी तुळजाभवानी मंदिर (Tulja Bhavani Temple) संस्थानाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमावलीनुसार तुळजाभवानी मंदिरात VIP दर्शन बंद करण्यात आले असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त डॉ. योगेश खरमाटे यांनी दिली आहे. नवीन नियामांनुसार, मंदिरात दर्शनासाठी महत्त्वाचे व्यक्ती त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य वगळता कोणत्याही व्यक्तीला मोफत पासेस दिले जाणार नाहीत. महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये महत्त्वाचे व्यक्ती त्यांची आई,वडिल, पत्नी,मुले यांचा समावेश असेल.

त्याचप्रमाणे मंत्री आणि त्यांच्यासोबत खासगी सचिव,विशेष कार्य अधिकारी यांचा समावेश असेल, असे सांगण्यात आले आहे. तर मंत्र्यासोबत येणाऱ्या इतर लोकांना घाटशीळ पार्किंग येथून प्रसाद देण्यात येईल,असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार,तुळजापूर मंदिरात दररोज केवळ १५ हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती मंदिर संस्थानाकडून देण्यात आली. तसेच तुळजाभवानीच्या मंदिरात कोणत्याही विधी आणि अभिषेक करण्यास परवानगी नाही. तुळजाभवानी मंदिरात देवीची दररोजची पूजा ही देवीचे महंत,सेवेकरी आणि मानकरी यांच्या हस्ते पार पडते.

तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात महाराष्ट्राबाहेरुन देखील भाविक दर्शनासाठी येत असताता. मंदिर परिसरात गर्दी होऊ नये यासाठी तुळजापूरात जिल्हाबंदी असणार आहे. दररोज पहाटे ४ ते रात्री १० वाजेपर्यंत तुळजाभवानीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले आहे. नवरात्रौत्सवासात तुळजापूर मंदिरात प्रचंड गर्दी झाल्याचे देखील पहायला मिळाले.

- Advertisement -

हेही वाचा – बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादासाठी पोचले पण…. चित्रा वाघ

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -