घरताज्या घडामोडीकरोना व्हायरस : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय, संजय गांधी राष्ट्रीय...

करोना व्हायरस : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीवांचे पिंजरे बंद

Subscribe

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नसून फक्त उद्यानातील वन्य प्राण्यांच्या पिंजऱ्याजवळ बाहेरील व्यक्ती फिरकणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे, अशी माहिती उद्यान प्रशासनाने दिले.

करोना विषाणूबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय तसेच बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नसून फक्त उद्यानातील वन्य प्राण्यांच्या पिंजऱ्याजवळ बाहेरील व्यक्ती फिरकणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे, अशी माहिती उद्यान प्रशासनाने दिले.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय १५ मार्चपासून नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. हे उद्यान आणि प्राणीसंग्रहालय प्रशासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बंद राहील. प्रशासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत उद्यान आणि प्राणी संग्रहालयाला येऊ नये व सहकार्य करावे, अशी विनंती उद्यान आणि प्राणीसंग्रहालय प्रशासनाने केली आहे.

- Advertisement -
images_1538725246129_sanjay_gandhi_national_park
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या बंदिस्त वन्य प्राण्यांच्या आणि त्यांची देखरेख करणारे कर्मचारी व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी वन्यप्राण्यांच्या पिंजऱ्याच्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी व अधिकारी यांच्या शिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला पिंजऱ्यातील प्रवेश पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आला आहे. याशिवाय पिंजऱ्यांवर कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये करोनाची लक्षण दिसत असल्यास कामावर न येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व पिंजरे व परिसर दिवसातून कमीत कमी दोन वेळा निर्जंतुक करण्याचे आदेश सिंह व व्याघ्र विहाराचे अधिक्षक विजय बारब्दे यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे आणि खाजगी पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मनीष पिंगळे प्रत्येक प्राण्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -