घरट्रेंडिंगपालघर मॉब लिंचिंग : आज 'बाळासाहेब' असते तर म्हणाले असते...

पालघर मॉब लिंचिंग : आज ‘बाळासाहेब’ असते तर म्हणाले असते…

Subscribe

गुरूवारी रात्री पालघरमध्ये जी मॉब लिंचिंगची घटना घडली. या घटनेत तीन सांधूना पोलिसांसमोरच ठार मारण्यात आलं. त्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर या घटनेवर चहू बांजूंनी टीका झाली. राजकारणींप्रमाणे कलाकारांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. अभिनेता सुमीत राघवनने ट्वीट करत या घटनेवर संताप व्यक्त आहे. त्यानंतर आता या घटनेबाबत बॉलिवूड दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री याने संताप व्यक्त केला आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय म्हणाले असते? असा प्रश्न त्याने महाराष्ट्र सरकारला विचारला आहे.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाला विवेक अग्निहोत्री?

“भारतात सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे, केवळ गुन्हेगारांच्या अटकेनेच संतुष्ट होतात. परंतु पोलिसांच्या उपस्थितीत ही घटना कशी घडली? हा प्रश्न आपण सरकारला विचारायला हवा. आज बाळासाहेब असते तर काय म्हणाले असते?  मला वाटतं त्यांनी आपल्या मुलाला बाहेर फिरण्याची संमती दिली नसती.” अशा आशयाचे ट्विट विवेकने केले आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय घडलं नेमकं?

गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास दाभाडी-खानवेल जंगलातील मार्गावर नाशिककडून येणार्‍या एका कारला दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेजवळ गडचिंचले गावात गावकर्‍यांनी रोखले. या प्रवाशांकडे विचारपूस केल्यानंतर त्यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक न वाटल्याने गावकर्‍यांनी दगड आणि व लाठी-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांची गाडीही उलटी करून टाकली. बेदम मारहाण झाल्याने जखमी झालेले गाडीतील तीन जण जागीच मरण पावले. यावेळी सातशेहून अधिकचा जमाव जमला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पण, संतापलेल्या जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. यात पोलिसांच्या गाड्यांचे नुकसान झाले.

- Advertisement -

काय म्हणाले मुख्यमंत्री?

पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील प्रमुख ५ हल्लेखोर आणि सुमारे १०० जणांना पकडले असून, गुन्हा अन्वेषण विभाग कसून तपास करीत आहे. मृतांमध्ये दोन साधू होते मात्र या प्रकरणाला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. सध्या आम्ही कोरोनाचे युद्ध नेटाने लढत आहोत. काही जण या घटनेवरून सोशल मिडीयाच्या माध्यमातून वातावरण तापवण्याचा प्रयतन करीत आहे मी याविषयी गृहमंत्री अमित शहा यांना सकाळी दूरध्वनीवरून बोलून सर्व कल्पना दिली आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या पाच वर्षातही आपल्या राज्यात मॉब लिंचिंग झालं. त्यामुळे पालघरमध्ये झालेल्या मॉब लिचिंगची घटनेला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करू नका, पालघर घटनेतील ११० हल्लेखोरांना त्याच दिवशी अटक केली असून कुणालाही सोडलं जाणार नाही. या हल्लेखोरांना कठोर शिक्षा केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.


हे ही वाचा – ‘संतांची, वीरांची नाही ही नराधमांची भूमी’ पालघर घटनेवर सुमीत राघवन संतापला!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -