घरCORONA UPDATEव्होडाफोन-आयडियाचे तीन नवे डबल डेटा प्लॅन्स; जाणून घ्या डेटाची माहिती

व्होडाफोन-आयडियाचे तीन नवे डबल डेटा प्लॅन्स; जाणून घ्या डेटाची माहिती

Subscribe

कंपनीने डबल डेटा ऑफरचे काही नवीन प्लॅन सुरू केले. व्होडाफोन-आयडियाने याआधी २४९ रुपयांचा डबल डेटा ऑफर बंद केला आहे.

व्होडाफोन-आयडिया काही दिवसांपूर्वी ग्राहकांना झटका देवून डबल डेटा ऑफर्सचे काही प्लॅन बंद केले. त्यांनतर कंपनीने डबल डेटा ऑफरचे काही नवीन प्लॅन सुरू केले. व्होडाफोन-आयडियाने याआधी २४९ रुपयांचा डबल डेटा ऑफर बंद केला आहे. यामध्ये रोज ३ जीबी (१.५ जीबी+१.५ जीबी) डेटा मिळत होता.

व्होडाफोन-आयडियाने सुरू केलेले तीन डबल डेटा ऑफर कंपनीने तीन नवीन डबल डेटा ऑफर ग्राहकांसाठी घेऊन आला आहे. यात २९९ रुपये, ४४९ रुपये आणि ६९९ रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. इन सभी प्लॅनमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. परंतु यात डबल डेटा लागू केल्यावर रोज ४ जीबी डेटा मिळतो. मात्र, कंपनीकडे याआधीही दोन प्लॅन आहेत, यात डबल डेटा ऑफर मिळतो. व्होडाफोन-आयडियाच्या या तिन्ही प्लॅनचा कालावधी क्रमशः २८ दिवस, ५६ दिवस आणि ८४ दिवस असा आहे.

- Advertisement -

ही योजना सध्या मर्यादित संख्येच्या सर्कलमध्ये उपलब्ध आहेत. व्होडाफोन-आयडियाचे डबल डेटा ऑफर प्लॅन दिल्ली, मध्य प्रदेश, मुंबई, कोलकाता, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, राजस्थान आणि जम्मू-काश्मीर येथे उपलब्ध आहे. तसेच ६९९ रुपयांचा प्लॅन आंध्र प्रदेश आणि तेलंगानामध्ये ही उपलब्ध आहे. सर्व प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि व्होडाफोन प्ले सब्सक्रिप्शन व ऑफर्स मिळणार आहेत.

लॉकडाऊन १.० प्रमाणे लॉकडाऊन २.० मध्येही सर्व टेलीकॉम कंपन्यांनी आपल्या यूजर्सची व्हॅलिडीटी ३ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच ग्राहकांना ३ मे पर्यंत रिचार्ज करण्याची गरज नाही. ग्राहकांची इनकमिंग सेवा सुरू राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -