घरताज्या घडामोडीव्हिप झुगारणाऱ्यांवर कारवाईसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून तक्रार दाखल

व्हिप झुगारणाऱ्यांवर कारवाईसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून तक्रार दाखल

Subscribe

व्हीपविरोधी मतदान केल्याची तक्रार दोन्ही गटातील प्रतोदांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाई म्हणून सेनेच्या दोन्ही गटांकडून काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विधानसभा अध्यक्ष पदासाठी शिवसेनेने राजन साळवी (Rajan Salvi) यांना मैदानात उतरवले होते. तर, भाजपने राहूल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचं नाव घोषित केले होते. आपल्या उमेदवाराला कमी मते मिळू नयेत म्हणून शिवसेनेने व्हिप जारी केला होता. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी हा व्हिप जारी करून राजन साळवी यांना मत देण्याचे आदेश दिले होते. त्याचनुसार, एकनाथ शिंदे गटातील (Eknath Shinde Group) प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनीही आपल्या गटातील आमदारांसाठी व्हिप जारी केला होता. त्यामुळे व्हिपविरोधी मतदान केल्याची तक्रार दोन्ही गटातील प्रतोदांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाई म्हणून सेनेच्या दोन्ही गटांकडून काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Vote Against Weep, both of leader of shivsena filed a complaint)

हेही वाचा – राहुल नार्वेकर नवे विधानसभा अध्यक्ष; शिंदे सरकारचा पहिला विजय

- Advertisement -

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. तर, भाजपच्या राहुल नार्वेकर यांना १६४ मते मिळाली. तीन आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली तर, १२ जण गैरहजर होते. शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाली. हीच संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला होता. त्यानुसार, त्यांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना मत देण्याचे आदेश दिले होते. सुनील प्रभू यांनी व्हिप जारी करताच, एकनाथ शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले यांनीही व्हिप जारी केला. त्यांच्या व्हिपनुसार, राहुल नार्वेकर यांना मत देण्याचे आदेश देण्यात आले होते.

हेही वाचा – …आता जावयांनी आमचा हट्ट पुरवावा, अजित पवारांच्या भाषणात हशा आणि टाळ्या

- Advertisement -

दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही प्रतोदांनी व्हीप जारी केल्यानंतर एकमेकांचे आदेश धुडकावून लावण्यात आले. बंडखोर आमदारांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांना मत दिले तर, उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिलेल्या आमदारांनी राजन साळवी यांना मत दिले.

हेही वाचा – राज्यात सेना-भाजप युतीचं सरकार, एकनाथ शिंदेंकडून घोषणा; भाजपचेही मानले आभार

मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र लिहित व्हीपविरोधात ३९ सदस्यांनी मतदान केल्याची तक्रार केली. या तक्रीरीची नोंद विधिमंडळात करण्यात आली आहे.

हेही वाचा – कायद्यातील निष्णात असलेले अध्यक्ष कायदेमंडळाला मिळाले – देवेंद्र फडणवीस

तर, दुसरीकडे भाजपच्या राहूल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड होताच, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी राहूल नार्वेकर यांच्याकडे व्हीपविरोधी १६ मतदान झाल्याची तक्रार केली. या तक्रारीचीही नोंद विधिमंडळात झाली आहे.

हेही वाचा विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत 12 सदस्य अनुपस्थित, सर्वाधिक राष्ट्रवादीचे

त्यामुळे, एकाच पक्षातील दोन गटांच्या प्रतोदांनी पक्षांतील नेत्यांविरोधात व्हीप बजावल्याने आता त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, ३९ सदस्यांनी व्हीप मोडून मतदान केलं आहे, त्यामुळे या संपूर्ण विधिमंडळाचा कार्यकाल किती काळ असेल आणि त्या खुर्चीवर आपण कितीकाळ बसाल या बद्दलची शंका देखील राज्याच्या जनतेला आहे हे दुर्दैवाने मला या ठिकाणी नमूद करावसं वाटतं,” असं सुनील प्रभू यांनी विधानसभेत अभिनंदनाच्या भाषणात म्हटलं.

हेही वाचा आरेतील कारशेडला सुमीत राघवनचा पाठिंबा; पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -