घरट्रेंडिंगVoting : बायकोचा फोटो Whatsapp स्टेटसवर ठेवणं पडलं महागात ; नवऱ्यावर गुन्हा...

Voting : बायकोचा फोटो Whatsapp स्टेटसवर ठेवणं पडलं महागात ; नवऱ्यावर गुन्हा दाखल

Subscribe

सोशल मिडियाच्या जगात माणसांचं एकमेकांशी असलेलं बोलणं कमी होऊन, हल्ली सर्वजण व्हॉट्सअप,फेसबुक आणि इंस्टाग्राम यावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. सोशलमिडियावर आपल्या प्रत्येक भावना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी वाणीचा नाही तर व्हॉट्सअप स्टेटसचा वापर करत असतात हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे.मात्र बुलडाण्याच्या नवरदेवाला आपल्या बायकोचा फोटो सोशल मिडियावर ठेवणं महागात पडलं आहे. या पठ्ठ्याने आपल्या बायकोचा मतदान करतानाचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याचं झालं असं की, दोन दिवसांपूर्वी नगरपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या.बुलडाण्याच्या एका व्यक्तीने मतदान करतानाचे उमेदवार असलेल्या बायकोचे फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवले होते. त्यामुळे मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी या बायकोच्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

बुलडाणा जिल्ह्यात २१ डिसेंबरला मोताळ आणि संग्रामपूर नगर पंचायतीसाठीचे मतदान पार पडले. या मतदानाच्या दिवशी पती प्रवीण शेळके पाटील यांनी त्यांची पत्नी शिवसेनेच्या उमेदवार वृषाली पाटील यांचा त्यांच्या नावासमोरील चिन्हावर बोट ठेवून मतदान करतानाचा फोटो काढला. हा फोटो काढून आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला.याप्रकरणी आरोपी प्रवीण शेळके यांच्यावर बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, व्हॉटसअप युजर्स देखील हैराण झाले आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – Pakistan VS Taliban: पाकिस्तान-तालिबानमध्ये चकमक; पाकिस्तानकडून गोळीबार


 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -