घरमहाराष्ट्रचार महानगरपालिकेतील पोटनिवडणूक जाहीर; २१ डिसेंबरला मतदान

चार महानगरपालिकेतील पोटनिवडणूक जाहीर; २१ डिसेंबरला मतदान

Subscribe

धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी बुधवारी दिली.

या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत स्वीकारले जातील. ७ डिसेंबर रोजी उमेदवारीअर्जांची छाननी होईल. उमेदवारीअर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबरपर्यँत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना १० डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. २१ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल तर मतमोजणी २२ डिसेंबरला होऊन निकाल जाहीर केला जाईल.

- Advertisement -

पोटनिवडणूक होत असलेली महानगरपालिकानिहाय रिक्तपदे

धुळे- ५ ब, अहमदनगर- ९ क, नांदेड वाघाळा- १३, सांगली मिरज कुपवाड- १६अ.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -