घरताज्या घडामोडीराज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या मतदानाला सुरूवात

राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या मतदानाला सुरूवात

Subscribe

राज्यातील सत्ता बदलानंतर महाविकास आघाडी आणि भाजपची या निवडणुकांमध्ये कसोटी लागणार आहे.

राज्यातील सहा जिल्हापरिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या ४४ पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडत आहे. राज्यातील सत्ता बदलानंतर महाविकास आघाडी आणि भाजपची या निवडणुकांमध्ये कसोटी लागणार आहे. दरम्यान सकाळच्या गारठ्यातही मतदार मतदानासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र होते.

या जिल्हा परिषदांमध्ये मतदान

नागपूर, अकोला, वाशीम, नंदुरबार, धुळे आणि पालघर या सहा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या ४४ पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडत आहे. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच उद्या मतमोजणी पार पडणार आहे.

- Advertisement -

भाजपसाठी निवडणूक प्रतिष्ठेची

विधानसभा निवडणुकीत जनमत असताना देखील भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. त्यानंतर विरोधी पक्षात बसलेल्या भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारात भाजपचा आक्रमक पवित्रा दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारात सहभाग घेतला. प्रचारामध्ये त्यांनी विशेषकरुन शिवसेनेवर निशाणा साधला.

हेही वाचा – #JNU Attack : गेट वे ऑफ इंडियावरचं आंदोलन पोलिसांनी थांबवलं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -