अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, भाजपाच्या माघारीनंतर ७ उमेदवार रिंगणात

उद्या अंधेरी पूर्व मतदारसंघात ३८ मतदान केंद्रावर मतदान होईल. मतदानासाठी एकूण २ लाख ७१ हजार ५०२ मतदार पात्र आहेत. मतदान पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पडावे म्हणून प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी ६ नोव्हेंबरला होऊन निकाल घोषित केला जाईल.

मुंबई – शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latake) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा (Andheri East By poll Elections) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. राज्यातील सत्तांतरानंतरची ही पहिलीच पोटनिवडणूक असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना प्रथमच धनुष्यबाण चिन्हाऐवजी मशाल या निवडणूक चिन्हावर लढत आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या नव्या चिन्हाला मतदारांचा कसा कौल मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – राज्य शासन शिक्षकांच्या वाढीव अनुदानाचा प्रश्न सोडविणार, दीपक केसरकरांची माहिती

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने या पोटनिवडणुकीतून माघार घेतली असली तरी लटके यांच्यासमोर छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचे आव्हान आहे. पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार नसला तरी भाजपाचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नोटाचा प्रचार चालवल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे.

हेही वाचा – राज्यातील सरकार घटनाबाह्य नाही, उज्ज्वल निकमांनी तारखांसहीत दिलं स्पष्टीकरण

अंधेरी पूर्व मतदारसंघात ३८ मतदान केंद्रावर मतदान होत असून मतदानासाठी एकूण २ लाख ७१ हजार ५०२ मतदार पात्र आहेत. मतदान पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पडावे म्हणून प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी ६ नोव्हेंबरला होऊन निकाल घोषित केला जाईल.

भाजपाची निवडणुकीतून माघार

अंधेरी पूर्व निवडणुका लागल्यानंतर शिवसनेने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. शिंदे गटाने भाजपाला पाठिंबा दर्शवला होता. तर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा शिवसेनेच्या उमेदवाराला समर्थन दिले. परंतु, ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत अधिकारी असल्याने त्यांच्या राजीनाम्यावरून बरेच नाट्य रंगले होते. कायदेशीर मुद्दे उपस्थित करून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास मुंबई महापालिकेने नकार दिला. त्यानंतर, हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्याने न्यायालायने मुंबई पालिकेचे कान टोचले. न्यायालयाच्या आदेशानुसार, पालिकेला लटकेंचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश दिले. त्यानंतर, भाजपाने ही निवडणूक लढवू नये, अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांनी लिहिले. दिवंगत आमदाराच्या जागेवर त्यांच्याच घरातील कोणी उभे राहत असेल तर त्याला बिनविरोध पाठिंबा दिला पाहिजे, अशी महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे या पत्रात लिहिले होते. शिवाय, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हीच भूमिका मांडली होती. त्यामुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पोटनिवडणुकीसाठी पक्षाची उमेदवारी मागे घेत असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा मला मुंबईच्या सामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याची इच्छा, अमृता फडणवीसांनी नाकारली सुरक्षा

अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार

  • ऋतुजा लटके शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  • बाला व्यंकटेश विनायक नाडार ( आपकी अपनी पार्टी, पीपल्स)
  • मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
  • नीना खेडेकर (अपक्ष)
  • फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
  • मिलिंद कांबळे (अपक्ष)
  • राजेश त्रिपाठी (अपक्ष)

अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार

महाराष्ट्रासह सहा राज्यांतील विधानसभेच्या सात जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. विशेष म्हणजे, भारतीय जनता पक्ष आणि प्रादेशिक पक्षांमध्ये ही प्रतीकात्मक लढत आहे. महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासह बिहारमधील मोकामा आणि गोपालगंज, हरयाणातील आदमपूर, तेलंगणातील मनुगोडा, उत्तर प्रदेशातील गोला गोकरनाथ, ओदिशातील धामनगर येथे पोटनिवडणूक होत आहे. भाजपाची साथ सोडून नितीश कुमार यांनी आपल्या नेतृत्वाखाली ‘महागठबंधन’ सरकार स्थापन केल्यानंतर बिहारमधील ही पहिलीच निवडणूक आहे.