घरपालघरवाडा तालुका हा पर्यटकांचा ठरतोय वाटाड्या, निसर्गरम्यस्थळी पुरातन मंदिरं ठरताहेत विलोभनीय

वाडा तालुका हा पर्यटकांचा ठरतोय वाटाड्या, निसर्गरम्यस्थळी पुरातन मंदिरं ठरताहेत विलोभनीय

Subscribe

कृषीबरोबरच या तालुक्यात प्रेक्षणीय स्थळे आहेत, ती पर्यटकांसाठी विशेष लक्ष वेधून घेत असतात. कृषी क्षेत्रात अंबो बाबाजीबापू पाटील, तसेच पालसई येथील पद्मन बुधाजी पाटील, किरण गोपाळ पाटील, अनिल पाटील, विलास वामन पाटील यांचे नावं आग्रहाने घेतली जातात. ही विशेष बाब मानली जातेय. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्याची पर्यटनस्थळे बघण्यासाठी गर्दी करत असतात.

– संतोष पाटील
पालघर : वाडा तालुक्यात अजूनही अशी प्रेक्षणीयस्थळे आणि ऐतिहासिक वारसा आणि पांडवकालीन, पुरातन काळातील मंदिरं आज पाहावयास मिळतात. यापूर्वी वाडा तालुक्याला कोलम तांदूळ पिकवणारा ओळखले जायचे. शेतीमध्ये अग्रेसर असलेले चिंचघर दिवंगत अंबो बाबाजीबापू पाटील, तसेच पालसई येथील पद्मन बुधाजी पाटील, किरण गोपाळ पाटील, अनिल पाटील, विलास वामन पाटील यांनी वाडा कोलम या वाणाला जागतिक पातळीवर दर्जा मिळून देण्याचा प्रयत्न केला आहे. या तालुक्यात कृषी क्षेत्रात उत्तम प्रगतीला हातभार लावला आहे.

कृषीबरोबरच या तालुक्यात प्रेक्षणीय स्थळे आहेत, ती पर्यटकांसाठी विशेष लक्ष वेधून घेत असतात. कृषी क्षेत्रात अंबो बाबाजीबापू पाटील, तसेच पालसई येथील पद्मन बुधाजी पाटील, किरण गोपाळ पाटील, अनिल पाटील, विलास वामन पाटील यांचे नावं आग्रहाने घेतली जातात. ही विशेष बाब मानली जातेय. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्याची पर्यटनस्थळे बघण्यासाठी गर्दी करत असतात.

- Advertisement -

वाडा तालुक्यातील गुंजकाटी या ठिकाणी पांडवकालीन बाल्यावस्थेत असलेली परशुरामाची मूर्ती मंदिर एका मोठ्या पाषाणाने बनविलेले आहे. हे मंदिर गुंज गावच्या एका डोंगरावर दृष्टीत पडते. तसेच याच गावी पांडवकालीन शिल्प, शिवलिंग आणि भागिरथीचे मंदिर भग्नावस्थेत तेथील विस्तीर्ण तलावाच्या काठी पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे याच गाव परिसरात काटी या गावी निसर्गरम्य वातावरणात वज्रेश्वरी मंदिराचे मूळस्थान म्हणून काटी यागावी त्यांचे मंदिर आहे. पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसई किल्ला सर करण्यासाठी पेशवे चिमाजी आप्पांनी वज्राई देवीला नवस केला होता. किल्ला सर झाला आणि नवस फेडण्यासाठी वज्रेश्वरी तालुका भिवंडी येथे किल्ल्याच्या स्वरूपाचे मंदिर बांधले. मात्र या देवीचे मूळस्थान वाडा तालुक्यातील गुंज-काटी परिसरात आहे. या ठिकाणी कालिका-रेणुका आणि वज्राई देवीच्या तीन मूर्ती एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. या देवींच्या मूर्ती वज्रेश्र्वरी तालुका भिवंडी इथल्या मंदिरातही पाहायला मिळतात.
काटी इथले मंदिर छोटेखानी आणि साध्या स्वरूपात आहे. इथल्या मंदिराच्या जवळच गरम पाण्याचे कुंड पाहावयास मिळतेय. या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या ठाण्यामार्गे बसच्या प्रवासाकरिता ठाणे-वाडा बसचा थांबा कुडूसला आहे.

याठिकाणी जाण्यासाठी पाच ते सात किलोमीटर जाण्यासाठी खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने असतात. कुडूस इथे राहण्याची आणि खाण्यासाठी हॉटेल आहेत. तसेच वाडा शहरातील खंडेश्र्वराचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर पुरातत्त्व विभाग वर्गीकृत आहे. मंदिरात शिवलिंग असून, परिसरात यमाचे शिल्प आणि नागदेवतेचे शिल्प दिसते. तसेच वाडा शहरातील पाटील आळीत स्वयंभू गणेशाचे मंदिर आहे. ही गणेशाची मूर्ती स्वयंभू असून, ती खूप जुनी वास्तू असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येतेय. वाडा शहराच्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर तिळसेश्र्वराचे शिवलिंगाचे मंदिर वैतरणा नदीपात्राच्या मोठ्या कातळावर हे मंदिर दिसते. या ठिकाणी राहण्याची खाण्याची सोय वाडा शहरातील हॉटेलमध्ये होऊ शकते.

- Advertisement -

नाथपंथीय भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून वाडा तालुक्यातील अंबिस्ते नागनाथ देवस्थान वैतरणा नदीच्या कडेला विस्तीर्ण जंगलव्याप्त परिसरात आहे. आजही नागनाथ देवस्थान नाथपंथीय धुनी कायम प्रज्वलित ठेवली जाते. येथे काळभैरवाचे मंदिर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी कुडूसहून खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने खानिवली गावापर्यंत जात असतात. हे अंतर दहा ते पंधरा किलोमीटरपर्यंत आहे. ही प्रेक्षणीय स्थळे पर्यटनासाठी वाडा तालुक्यासाठी हा पर्यटकांना वाटाड्या ठरत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -