घरCORONA UPDATEवाधवान बंधूंचा क्वारंटाइन काळ संपला; सरकारने दिले अटकेचे आदेश

वाधवान बंधूंचा क्वारंटाइन काळ संपला; सरकारने दिले अटकेचे आदेश

Subscribe

लॉकडाऊन असतानाहाी वाधवान कुटुंबियांसह २१ जण ५ गाड्यांमधून महाबळेश्वरला गेले असल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. पीएमसी बँक घोटाळ्यातील हे वाधवान बंधू कुटुंबियांसह तेव्हा पासून पाचगणीच्या एका हॉटेलमध्ये १४ दिवसांसाठी क्वारंटाइन होते. मात्र बुधवारी त्यांचा क्वारंटाइन काळ संपला असल्याचे गृहमंत्र्यांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबतची माहिती आणि पत्रक त्यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.

- Advertisement -

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआय आणि ईडीला डीएचएफएलचे मालक कपिल वाधवान तसेच त्यांचे बंधू धीरज वाधवान यांना त्वरीत ताब्यात घेण्याचे आदेश दिले असून त्यावरील पुढील कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच जोवर वाधवान बंधूंना सीबीआय किंवा ईडीच्या ताब्यात दिले जात नाही. तोवर ते सरकारच्या अखत्यारीतच राहतील, असेही गृहमंत्र्यांनी नमूद केले आहे.

काय आहे प्रकरण 

डीएचएफएलचे संस्थापक असलेल्या वाधवान कुटुंबाने लॉकडाऊनच्या काळात खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. यासाठी त्यांना प्रधान सचिवांनी मदत केल्याने वाद निर्माण झाला होता. प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी अधिकारांचा गैरवापर करत वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत केल्याचे समोर आल्यानंतर सरकारने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमिताभ गुप्ता यांना या प्रकरणी चौकशी संपेपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Coronavirus: चांगली बातमी, महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉट १४ वरुन ५ वर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -