घरमहाराष्ट्रते पत्र अमिताभ गुप्ता यांनीच दिले गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

ते पत्र अमिताभ गुप्ता यांनीच दिले गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

Subscribe

मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती वाधवान यांना लॉकडाऊनदरम्यान प्रवासासाठी विशेष परवानगीचे पत्र कोणाच्याही दबावाविना आपणच दिल्याचे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले गृह विभागाचे मुख्य सचिव अमिताभ गुप्ता यांनी कबूल केले आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. या प्रकरणाचा चौकशी अहवाल आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

देशमुख म्हणाले, या सर्व प्रकरणामध्ये अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीसाठी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार लॉकडाऊनच्या काळात वाधवान कुटुंबियांना मुंबईहून महाबळेश्वरला जाण्यासाठी मंत्रालयातून जे पत्र देण्यात आले होते, ते पत्र स्वतः आपणच दिल्याचे अमिताभ गुप्ता यांनी कबूल केले आहे. हे देताना त्यांच्यावर कुणाचाही दबाव नव्हता, असेही त्यांनी चौकशीत म्हटले आहे.

- Advertisement -

यानंतर रितसर या प्रकरणाची फाईल तयार होईल आणि ती मुख्यमंत्र्यांकडे पाठवली जाईल. त्यानंतर यावर निर्णय होईल. त्याचबरोबर हा चौकशी अहवाल पुढील काळात सार्वजनिक करण्यात येईल, असेही यावेळी गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्र करोनाच्या लढाईशी लढत असताना मधल्या काळात या पत्रावरून जे राजकारण करण्यात आले, हे दुर्दैवी होते. अमिताभ गुप्तांवर कोणी दबाव आणला असा प्रश्न विचारत त्यावेळी विरोधकांकडून घाणेरडे राजकारण करण्यात आले. यामध्ये यापूर्वी महाराष्ट्राचे नेतृत्व करणारेच पुढे होते हे दुःखदायक आहे, अशा शब्दांत देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टोला लगावला.

- Advertisement -

‘लॉकडाउन’मध्ये प्रवास करणारे वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात

लॉकडाउनच्या काळात गृह विभागातील वरिष्ठ अधिकार्‍याचे शिफारस पत्र घेऊन प्रवास करणारे डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान आणि त्यांचे बंधू धिरज वाधवान यांना सीबीआयच्या पथकाने रविवारी ताब्यात घेतले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी माहिती दिली.

राज्यात करोनामुळे लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जात असताना डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान यांचे प्रकरण समोर आले होते. राज्याच्या गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचे शिफारस पत्र घेऊन वाधवान यांच्या कुटुंबीयांसह २३ जण लॉकडाउनच्या काळात प्रवास करून महाबळेश्वरला गेले. तेथे पाचगणी पोलिसांनी या सगळ्यांना अटक केले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

दरम्यान, येस बँक प्रकरणात चौकशीसाठी हवे असलेले दिवाण हौसिंग फायनान्स लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान तसेच त्यांचे बंधू धीरज वाधवान यांना विलगीकरणानंतर आपल्याला कळविल्याशिवाय सोडण्यात येऊ नये, असे पत्र केंद्रीय गुप्तचर विभागाने सातार्‍याचे जिल्हा न्यायाधीश तसेच पोलीस अधीक्षकांना पाठविले होते. वाधवान यांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्यानंतर सीबीआयच्या विशेष पथकाने त्यांना सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -