Monsoon News : दिलासाजनक! यंदा मान्सूनचे 10 दिवस आधीच आगमन: मुंबई, कोकणात कधी होणार सुरूवात?

waether updates is year monsoon will arrive 10 days earlier on the kerala coast according to european centre for medium rang weather
Monsoon News : दिलासाजनक! यंदा मान्सूनचे 10 दिवस आधीच आगमन: मुंबई, कोकणात कधी होणार सुरूवात?

देशात एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून उन्हाचा पारा वाढत आहे. अशा परिस्थितीत आता देशात मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. यंदा देशात 10 दिवस आधीच मान्सून दाखल होणार आहे. सर्वात आधी मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो. त्यानुसार मान्सून आगामी 20 ते 21 रोजी केरळ किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यानंतर पुढील काही दिवसात उर्वरित भागात बरसणार असल्याची अंदाज ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर पह्रकास्ट’ संस्थेने वर्तवला आहे. त्यामुळे पाणी टंचाई, वीज टंचाई आणि त्यात उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान अंदमान नंतर भारतात सर्वात आधी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात मान्सून आगमनाला सुरुवात होतो. मात्र संस्थेच्या अंदाजानुसार, यंदा हवामान व्यवस्थित राहिल्या 28 ते 30 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळनंतर साधारण 7 दिवसांनी मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, म्हणजे तळकोकणात मान्सून 7 जून पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. तर 11 जून पर्यंत मान्सून मुंबईत दाखल होऊ शकतो.

हवामान बदलामुळे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वातावरणीय बदलांमुळे केरळमध्ये मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या वर्षी देखील मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज होता मात्र चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला, यंदाही अशा अडचणी आल्यास मान्सूनच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.

यंदा देशात सरासरी 99 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान भारतीय मान्सूनचा पहिला अंदाज 14 एप्रिलला जाहीर केला होता. त्यानुसार, यंदा देशात पाऊस सामान्य राहण्याचा अंदाज आहे. यंदा देशात चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, दरम्यान महाराष्ट्रात तळकोकणातून मान्सूनला सुरुवात होते. यंदा हवामान विभागच्या अंदाजानुसार, तळकोकणात मान्सून 7 जून पर्यंत दाखल होईल तर 11 जून पर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्य पाऊस पडला तरी शेतकऱ्यांना फायदा होईल.


संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक, देशपांडेंचा पोलिसांकडून शोध सुरु