घरCORONA UPDATEबेस्टच्या एक हजाराहून अधिक कंत्राटी कामगारांचे वेतन कपात

बेस्टच्या एक हजाराहून अधिक कंत्राटी कामगारांचे वेतन कपात

Subscribe

बेस्ट प्रशासनाने या अंग मेहनत करणाऱ्या एक हजार कंत्राटी कामगारांचे वेतन कपात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

लॉकडाऊन काळात रुग्णालय आणि मुंबईकरांच्या घरातील विद्युत पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा म्हणून बेस्टच्या विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांबरोबर बेस्टचे कॅज्युअल लेबर (कंत्राटी कामगार) सुद्धा या संकटकाळात जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता आपली सेवा देत आहे. मात्र, बेस्ट प्रशासनाने या अंग मेहनत करणाऱ्या एक हजार कंत्राटी कामगारांचे वेतन कपात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सतत बेस्टसाठी काम करणाऱ्या कामगारांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पोलीस, डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, सरकारी यंत्रणा देवदूत म्हणून काम करीत आहे. तसेच मुंबईकरांना अखंडित वीज पुरवठा सेवा देण्याचे काम बेस्ट उपक्रमातील विद्युत विभागाचे कर्मचारी करत आहे. या बेस्टचा विद्यूत विभागातील फिल्डवर काम करणाऱ्यामध्ये बेस्टचे एक हजारापेक्षा जास्त कंत्राटी कामगार काम करत आहे. हे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून बेस्टमध्ये आपली सेवा देत आहे. खड्डा खोदणे, केबल टाकणे अशा अंग मेहनतीचे काम करणाऱ्या कामगारांची लॉकडाऊन काळात आर्थिक पिळवणूक बेस्ट प्रशासनांकडून करण्यात येते आहे. बेस्टमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मात्र, संकटकाळात आपल्या कुटूंबियांचा उदरनिर्वाह करण्याकरिता आपलं जीव धोक्यात घालून कर्तव्यांवर येत आहे. मात्र, महिन्यात जेवढ्या दिवस काम केले त्यांचे पैसे देत आहे. उर्वरित दिवसांचे वेतन बेस्टकडून कापण्यात येत आहे. परिणामी त्यांच्यावर आज उपाशी राहण्याची पाळी आली आहे. यासंबंधित बेस्टचा जनसंपर्क विभागाला माहिती विचारली, तर माहिती घेऊन सांगतो असं सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

कामगार मंत्र्याकडे केली तक्रार

कॅज्युअल लेबर (कंत्राटी कामगार) यांना प्रत्यक्ष काम केलेल्या दिवसांसाठीच वेतन मिळाले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार कंत्राटी कामगारांना लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण वेतन देणे बेस्ट उपक्रमावर बंधनकारक आहे. मात्र बेस्टकडून यांची अंलबजावणी केली नाही. आम्ही
याबाबत व्हॉटस अॅप आणि भ्रमणध्वनीवर बेस्ट उपक्रमाशी संबंधित अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, बेस्ट कमिटी सदस्य यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधला आहे. तसेच राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तक्रार सुद्धा केली आहे, अशी माहिती बेस्ट जागृत कामगार संघटनेचे, सरचिटणीस सु. शां. नलावडे यांनी दैनिक आपलं महानगराला दिली आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार कंत्राटी कामगारांना लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र, बेस्ट प्रशासन आदेशाचे भंग करत आहे. या बेस्ट प्रशासनांवर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे.  
– सु. शां. नलावडे, सरचिटणीस, बेस्ट जागृत कामगार संघटना.  

बेस्टचे कॅज्युअल लेबर गेली अनेक वर्ष बेस्टसाठी सातत्याने काम करत आहे. ते सुद्धा अशा आपत्कालीन परिस्थितीत जनतेमध्ये जाणून अंग मेहनतीचे काम करत आहे. अशा गरीब कामगारांना बेस्टकडून वेतनापासून वंचित ठेवणे. ही एक प्रकारची क्रूर चेष्टा आहे. त्यामुळे हे योग्य नसून बेस्ट प्रशासनाने तात्काळ या कामगारांना वेतन देण्यात यावेत.
– सुनील गणाचार्य, वरिष्ठ सदस्य, बेस्ट समिती.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -