घरमहाराष्ट्रभाजपमुळे विस्ताराचा घोळ; शनिवारी राज्यपाल, तर रविवारी मुख्यमंत्री दिल्लीत

भाजपमुळे विस्ताराचा घोळ; शनिवारी राज्यपाल, तर रविवारी मुख्यमंत्री दिल्लीत

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेणार असून, उज्ज्वल निकम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राज्यातील सत्तासंघर्षावर मार्गदर्शन करणार आहेत

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्रांती घेण्याचा डॉक्टरांनी दिलेला सल्ला, भाजपमध्ये मंत्र्यांच्या यादीवरून असलेली असहमती आणि आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रविवारपर्यंत पुढे ढकलला गेल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत राजभवनवर मंत्रिमंडळात समावेश होणार्‍या आमदारांची यादी पोहोचली नव्हती.

मागील दीड महिना सततच्या दगदगीमुळे मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टर नंदनवन बंगल्यावर गुरुवारी सकाळी दाखल झाले होते. डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना एक दिवसाचा विश्रांतीचा सल्ला दिल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दुपारी एकट्यानेच दिल्ली गाठली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली आहे.

- Advertisement -

आपल्या दिल्ली भेटीत फडणवीस हे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप श्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कर्नाटक दौर्‍यावर होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीच भेट घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी उद्या संध्याकाळी त्यांचे 40 आमदार आणि समर्थक आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांची रात्री उशिरा भेट घेतली असून, त्यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झालीय. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राज्यातील सत्तासंघर्षावर मार्गदर्शन करीत आहेत.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी शपथ घेतली. तेव्हापासून राज्यात दोघांचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आहे. दोघांच्या मंत्रिमंडळावर चौफेर टीका होत असतानाही शिंदे गट आणि भाजपला मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लावणे शक्य झालेले नाही. आज ३५ दिवस उलटूनही मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्हे दिसत नसल्याने इच्छुकांमध्ये घालमेल सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाची मंत्र्यांची यादी तयार आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली भेटीत भाजपच्या मंत्र्यांची यादी निश्चित झाल्यास रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शनिवारी पंतप्रधानांच्या बैठकीसाठी दिल्लीत आहेत. तर मुख्यमंत्री शिंदे हे आझादी का अमृत महोत्सव आणि नीती आयोगाच्या बैठकीसाठी रविवारी दिल्लीला जाणार आहेत. ते दिल्लीतून आल्यानंतर रविवारी संध्याकाळीसुद्धा नव्या मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांंच्या माहितीनुसार शिंदे गटाची मंत्र्यांची यादी तयार आहे, तर अमित शहा भाजपच्या मंत्र्यांची यादी अंतिम करणार आहेत.

भाजपने शिंदे गटासोबत सत्ता स्थापन करताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊन मोठा धक्का दिला. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून धक्कातंत्र अपेक्षित आहे. तसे झाले तर भाजपमधील अनेक इच्छुकांना पक्षाच्या आदेशानुसार सक्तीचा त्याग करावा लागेल. २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून मंत्र्यांची यादी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे भाजप मंत्र्यांच्या यादीबद्दल खुद्द भाजपमध्येच प्रचंड उत्सुकता आहे.


हेही वाचाः ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी; लवकरच राहण्यास जाण्याची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -