Homeमहाराष्ट्रमराठवाडाWalmik Karad In ICU : कराड सध्या आयसीयूमध्ये, जामीन अर्जही घेतला मागे;...

Walmik Karad In ICU : कराड सध्या आयसीयूमध्ये, जामीन अर्जही घेतला मागे; नेमकं काय घडतंय?

Subscribe

बीडच्या विशेष सत्र न्यायालयात वाल्मीक कराडला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले असता पुन्हा एकदा त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर वाल्मीक कराडने आपल्या वकिलांमार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र वाल्मीक कराडवर मकोकाअंतर्गत कारवाई झाल्यामुळे पुढील सहा महिने त्याचा मुक्काम जेलमध्ये असणार आहे.

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराड यांच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यानंतर केज न्यायालयाने वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी आहे. महत्त्वाचे म्हणजे वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यामुळे त्याला किमान 180 दिवस जामीन मिळू शकत नाही. असे असले तरी वाल्मीक कराडने जामीन अर्जासाठी अर्ज केला आहे. याप्रकरणी आज सुनावणी होणार होती. मात्र वाल्मीक करडला बुधवारी (22 जानेवारी) तब्येतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर वाल्मीक कराडने आज सुनवणी होण्याआधीच जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आजची सुनावणी होऊ शकलेली नाही. (Walmik Karad is undergoing treatment in the ICU of the district government hospital)

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा वाल्मीक कराडच्या पोटात दुखू लागले, तसेच त्याला अस्वस्थही वाटू लागले. त्यामुळे त्याला रात्री पावणेबाराच्या सुमारास जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी वाल्मीक कराडची तपासणी केल्यानंतर त्याला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. तसेच मधुमेह आणि रक्तदाबाची तपासणीही यावेळी करण्यात आली. सध्या वाल्मीक कराडवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र मकोकाअंतर्गत कारवाईत किमान 180 दिवस आरोपीला जामीन मिळत नाही. यानंतर वकिलांकडून जामीन अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे आता वाल्मीक कराडला पुढील सहा महिने जेलमध्येच राहावे लागणार आहे.

हेही वाचा – Walmik Karad : कराड आणि इतर आरोपींचा एकाच गाडीतून प्रवास, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

वाल्मीक कराडचे पुढील 6 महिने जेलमध्येच 

दरम्यान, वाल्मीक कराडवर मकोकाअंतर्गत कारवाई झाल्यानंतर त्याला सुरुवातीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर त्याची पोलीस कोठडी बुधवारी संपली. त्यामुळे त्याला बीडच्या विशेष सत्र न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले असता पुन्हा एकदा कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर वाल्मीक कराडने आपल्या वकिलांमार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र मकोकाअंतर्गत कारवाई झाल्यामुळे वाल्मीक कराडचा पुढील सहा महिने मुक्काम जेलमध्ये असणार आहे. या काळात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करताना सीआयडीला जेव्हा कधी वाल्मीक कराडची गरज भासेल, तेव्हा न्यायालयाच्या परवानगीने सीआयडी कराडची चौकशी करता येणार आहे.

हेही वाचा – Thackeray vs Shinde : ठाकरे अंधेरीत तर, शिंदे बीकेसीत; बाळासाहेबांच्या जयंतीदिनी आमनेसामने