हिंगोली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लोकसभा मतदार संघाच्या आढावा बैठकानंतर राज्यव्यापी दौरा करणार आहेत. येत्या 27 ऑगस्टला ते हिंगोलीच्या (Hingoli) रामलीली मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत. पण याआधीच ठाकरे गट आणि शिंदे गटात शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ (Ayodhya Pole) यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्यांनी आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचे नाव न घेता वक्तव्य केलं की, ‘सर्व चिरकुटांना मी सांगू इच्छिते की, मार्केटिंग व बॅनरबाजीची गरज तुम्हालाच आहे, अशी सडकून टीका ट्वीट करत केली आहे. (Want to tell all Chirkuts that Ayodhya Poles attack Shinde group)
हेही वाचा – Sharad Pawar : “अजित पवार आमचेच नेते…,” सुप्रिया सुळेंपाठोपाठ शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ
अयोध्या पोळ यांनी ट्वीट करताना म्हटले की, ‘कळमनुरी विधानसभेचे गद्दार व त्याचे चेलेचपाटे त्यांनी लावलेल्या बॅनर्सचे व्हिडिओ मला पाठवत आहेत. गद्दार सहीत सर्व चिरकुटांना सांगू इच्छिते की, मार्केटिंग व बॅनरबाजीची गरज तुम्हालाच आहे. कारण जो बापमाणूस हिंगोलीत येतोय तो तळपता सुर्य आहे, एक ब्रॅंड आहे. ज्याला मार्केटिंग व बॅनरबाजीची गरच नाही हे लक्षात ठेवा, असा इशारा अयोध्या पोळ यांनी शिंदे गटाला दिली आहे.
कळमनुरी विधानसभेचा #गद्दार व त्याचे चेलेचपाटे मला त्यांनी लावलेल्या बॅनर्सचे व्हिडिओ पाठवत आहेत तर गद्दार सहीत सर्व चिरकुटांना सांगू इच्छिते की मार्केटिंग व बॅनरबाजीची गरज तुम्हालाच आहे कारण जो #बापमाणूस हिंगोलीत येतोय तो तळपता सुर्य आहे, एक ब्रॅंड आहे ज्याला मार्केटिंग व…
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) August 24, 2023
उद्धव ठाकरे हे 24 कॅरेट अस्सल ब्रॅंडचं मार्केट डाऊन करण्यासाठी स्वयंघोषित जागतिक स्तराची महाशक्ती अपयशी ठरत आहेत. तिथं तु तुझी अगरबत्ती कुठे लावतो गद्दार दादुड्या? हिंगोलीत स्वयंघोषित महाशक्तीचा बाप येतोय, अशी सडकून अयोध्या पोळ यांनी संतोष बांगर यांच्यावर केली आहे. यावेळी त्यांनी 27 ऑगस्ट रामलीला मैदान हिंगोली हे स्थळही सांगितले आहे.
हेही वाचा – स्वार्थासाठी अनेक लोक बरबटले; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर वडेट्टीवार यांची टीका
अयोध्या पोळ संतोष बांगर आधीही लगावला आहे टोला
दरम्यान राज्यभरात मे महिन्यात पार पडलेलया कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या निवडणुकीपूर्वी हिंगोली येथील कळमनुरी बाजार समितीमध्ये 17 पैकी 17 जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा संतोष बांगर यांनी केला होता. मात्र त्यांना फक्त 5 जागांवर विजय मिळवता आला होता. यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकारी आयोध्या पौळ संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला होता. संतोष बांगर यांच्या आव्हानाची त्यांना आठवण करत “मिशा कधी काढणार?” असा खोचक प्रश्न अयोध्या पोळ यांनी उपस्थित केला होता.