राज्याचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हिंगणघाट वर्ध्याची पूर (Wardha Flood) परिस्थितीची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यावेळी फडणवीसांनी शेतकऱ्यांना जास्तीत-जास्ती मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं. वर्धा जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्री ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे अनेक गावांना पुराने वेढले आहे.
विदर्भातील (Vidarbha) नागपूरमध्ये रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु, त्याच रात्री शहरात तुफान बॅटींग केली. त्यामुळे रस्ते जलमय झाले होते. या पार्श्वभीवर आज देवेद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले. तसेच, सध्या मोठ्या प्रमाणात वर्ध्याला पुराचा फटका बसला असून शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्ती मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे आश्वासनही दिले.
वर्धा जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्री ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे अनेक गावांना पुराने वेढले आहे. मागील दहा दिवसात दुसऱ्यांदा गावात पाणी शिरल्यानं नागरिक संकटात सापडले आहेत. नागरिकांकडून आता गावाचे पुनर्वसन करा, अशी मागणी केली जात आहे.
गावातीलच लेंडी नाला आणी लाडकी नदीला आलेल्या पुरामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रीपासूनच घरात पाणी शिरायला सुरवात झाल्याने नागरिकांनी घराच्या उंच ठिकाणी जातं स्वतःला सुरक्षित ठेवले. नऊ जुलैला यापूर्वी आलेल्या पावसामुळे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
त्याशिवाय, चिमूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे उमा नदीला पूर आला आहे. उमा नदीच्या पुरामुळे पुढच्या भागातील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे मूल-चामोर्शी मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद केली. तसेच, जिल्ह्यातील अनेक मार्ग पुराच्या पाण्याने बंद असताना हा मार्ग बंद करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात जाणारा आणखी एक मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त लावून दोन्ही बाजूला वाहनधारकांना वाहतुकीस मनाई केली. परिणामी वाहनचालकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा – वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी, शिवसेनेला धक्का