घरताज्या घडामोडीउपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा अपमान

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा अपमान

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कार्यक्रमात गोधळ झाल्यची बातमी समोर येत आहे. साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमेलनात हजेरी लावली होती.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कार्यक्रमात गोधळ झाल्यची बातमी समोर येत आहे. साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमेलनात हजेरी लावली होती. मात्र, फडणवीसांच्या सुरक्षेसाठी तपास यंत्रणांकडून कसून तपासणी सुरू होती. त्यावेळी या तपासणीच्या अतिरेकाने साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना व्यासपीठावर जाता आले नाही. त्यामुळे नरेंद्र चपळगावकर यांनी कार्यक्रमापासून दूर राहणे पसंत केले. (Wardha Sahitya Sammelan 2023 Devendra Fadnavis President Justice Narendra Chapalgaonkar)

रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणा प्रचंड सतर्क झाली होती. संमेलन नगरीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रवेशद्वारावर कसून तपासणी केली जात होती. मात्र, याच तपासणीचा फटका ८५ वर्षांच्या संमेलन अध्यक्षांनाही बसला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र चपळगावकर यांच्या कन्या भक्ती चपळगावकर यांनी तपासणीवेळी पोलिसांना विनंती करूनही त्यांनी गाडी मुख्य मांडवापर्यंत येऊ दिली नाही. त्यामुळे भक्ती यांनी संताप व्यक्त केला.

“मागील दोन दिवस सरकारी सुरक्षा व्यवस्थेमुळे माझ्या ८५ वर्षांच्या बाबांना आणि त्यांच्या ८८ वर्षांच्या मित्राला डॉ. सुधीर रसाळ यांना वेळोवेळी अडवण्यात आले. मुख्यमंत्री आले तेंव्हा ९०० पोलिस होते, आज उपमुख्यमंत्री येणार म्हणून होते. मी प्रत्येकवेळी पोलिसांना समजावून, विनंती करून, ओरडून मार्ग काढला. पण आज धीर संपला आणि पोलिसांना ओरडले, चालणार नाहीत ते, एवढे अंतर चालू शकणार नाहीत. बिचारे पोलिस आदेशाचे पालन करत होते. ते बावचळले आणि जा म्हणाले. बाबांना काहीही फरक पडला नाही. गाडी शेवटी ग्रंथ प्रदर्शनाकडे वळली”, असे भक्ती चपळगावकर यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘मुंबईकरांनो सावध व्हा…’, संजय राऊतांचे आवाहन; नेमके प्रकरण काय?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -