आषाढी एकादशीसाठी वारकऱ्यांकडून पंढरपूरला येण्याची विनंती; उद्धव ठाकरे म्हणाले…

warkaris request uddhav thackeray come to pandharpur for ashadhi ekadashi 2022

राज्यातील राजकीय सत्तांतरणात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणीची पूजा कोण करणार यावरून चर्चा रंगत होत्या. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र अचानक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्याने त्यांनाच विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर वारकरी संघटनांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट देत महापूजेचे आमंत्रण दिलेय, एकनाथ शिंदे यांनी देखील हे आमंत्रण स्वीकारलं आहे. यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही वारकऱ्यांच्या आग्रहाखातर पंढरपूरला विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे म्हटले आहे.

यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, एकदोन दिवसावर आषाढी एकादशी आली आहे, लाखो वारकरी तल्लन होऊन विठू माऊलीचा गजर करत पंढरीला पोहचणार आहेत. काही जण आषाढी दिवशी माऊलीचं दर्शन घेणार आहेत. काही जण आज उद्यामध्ये माऊलीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. मलाही वारकऱ्यांचे निरोप आले की, साहेब आपणही आषाढी एकादशीसाठी पंढपुरला विठ्ठल दर्शनासाठी या, मी म्हटले माझ्या मनामध्ये ह्रदयामध्ये विठू माऊली कायम असते आहे. मी जाणार नक्की, मात्र या सगळ्या गदारोळात मी पंढपूरला जाणार नाही, पण मी नंतर मात्र पंढरपूरला जाऊन विठू माऊलीची दर्शन घेईन.

यंदा 10 जुलैला पंढरपुरात आषाढी एकादशीचा सोहळा पार पडेल. यंदा जवळपास दोन वर्षांनंतर आषाढी वाराची सोहळा मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणात पार पडत आहे. संत ज्ञानेश्वरांसह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. तर पायी प्रवास करुन जाणाऱ्या पालख्या 9 जुलैला पंढरपूरला पोहचतील.

विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान हा अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांकडे आहे. यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर 2020 पासून गेली दोन वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा झाली. यानंतर यंदा या महापूजेचा मान कोणाला मिळणार यावरून तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र फडणवीसांच्या घोषणेनंतर यंदा शासकीय महापूजेचा मान राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदेंना मिळणार आहे. एकनाथ शिंदे सपत्नीक पंढरपूरच्या विठ्ठलाच्या महापूजेचा मान घेणार आहेत.


सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, ‘न्यायदेवतेवर विश्वास, 12 तारखेला सुनावणीचा निकाल’