Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पाच टप्प्यात आंदोलन करण्याचा सरकारला इशारा, जुन्या पेन्शन योजनेवरून संघटना आक्रमक

पाच टप्प्यात आंदोलन करण्याचा सरकारला इशारा, जुन्या पेन्शन योजनेवरून संघटना आक्रमक

Subscribe

मुंबई : जुन्या पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्राभर सरकारी कर्मचारी विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन करत आहेत. राज्यातील विविध ठिकाणी सरकारी कर्मचारी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येत जोरदार मुंडन करताना घोषणाबाजी देत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या सोलापुरातील महापालिकेचे काही कर्मचारी सरकारचा निषेध म्हणून हातावर काळ्या फिती बांधून आपले काम करत आहेत, तर इतर कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मात्र गेल्या चार दिवसांपासून सरकारकडे वारंवार मागणी करून देखील सरकार कोणतेच निर्णय घेताना दिसत नसल्यामुळे कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे आज सोलापुरातील जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी कोणत्याच सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुंडन आंदोलन केल्याचे कर्मचारी समन्वय समितीचे शंतनू गायकवाड यांनी सांगितले.

- Advertisement -

शंतनू गायकवाड म्हणाले की, “आज आंदोलनाचा चौथा दिवस असून सरकार कोणत्याही चर्चेसाठी आम्हाला बोलवत नाही आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही काल जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला होता. आजपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू करताना आम्ही शासनाचा निषेध म्हणून ‘मुंडन आंदोलन’ सुरू केले आहे. सरकार सामन्य जनतेला वेठीस धरत आहे. आम्हाला आंदोलन करण्याची इच्छा नाही. पण सरकारने आम्हाला चर्चेसाठी बोलवावे आणि जुनी पेन्शन योजना सहा महिन्यात पुन्हा लागू करतो, असे दोन ओळींचे पत्र लिहून द्यावे. पत्र मिळताच आम्ही अवघ्या पाच मिनिटांत आंदोलन स्थगित करायला तयार आहोत.

पण सरकारने आम्हाला लवकर चर्चेसाठी बोलावले नाही तर आम्ही आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू करताना ‘भीक मांगो’ आंदोलन करणार आहोत. त्यानंतर चौथा टप्पा म्हणून सामाजिक हित जपत ‘रक्तदान शिबीर आंदोलन’ करणार आहोत. अशाप्रकारे आंदोलन केल्यानंतरही सरकारला जाग आली नाही तर पाचवा आंदोलनाचा पाचवा टप्पा सुरू करणार आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जसे थाळी वाजवून करोना घालवला होता. त्याप्रमाणे आम्ही कर्मचारी थाळी वाजवून पाचवा टप्पा सुरू करणार आहोत, अशी भूमिका शंतनू गायकवाड यांनी आज मांडली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -